स्वस्तात मालमत्ता खरेदीची संधी बँक ऑफ बडोदा करणार ई-लिलाव

देशातील अनेक सरकारी बँका अनेक प्रकारच्या मालमत्तांचा लिलाव वेळेवेळी करत असतात. आता बँक ऑफ बडोदा ई-लिलाव करणार आहे. या लिलावात तुम्ही खूप कमी दरात अनेक चांगल्या मालमत्ता खरेदी करू शकता.

बँक ऑफ बडोदाने ३० ऑक्टोबर २०२३ रोजी ई-लिलाव आयोजित केला आहे. बँकेने एक्स पोस्टद्वारे म्हटले की, भारतभर मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळवा! ३० ऑक्टोबर २०२३ रोजी #BankofBaroda च्या मेगा-ई-लिलावात सामील व्हा आणि तुमच्या आवडीच्या शहरात तुमच्या स्वप्नातील मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळवा.

तुम्ही सणासुदीच्या काळात घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा लिलाव एक संधी. या लिलावात सहभागी होऊन देशातील मोठ्या शहरांमध्ये अतिशय कमी किमतीत मालमत्ता खरेदी करता येणार आहे. बँक ऑफ बडोदा या ई-लिलावामध्ये व्यावसायिक, औद्योगिक, कृषी, सदनिका, जमीन आणि घर खरेदी करण्याची सुविधा देत आहे. या ई-लिलावात सहभागी व्हायचे असल्यास, www.bankofbaroda.in/e-auction/e-auction-notices या अधिकृत लिंकला भेट द्या. या लिंकवर तुम्हाला लिलावाशी संबंधित सर्व माहिती मिळेल.

देशातील अनेक सरकारी बँका वेळोवेळी अनेक प्रकारच्या मालमत्तांचा लिलाव करत असतात. बँकेचे कर्ज फेडलेले नाही अशा मालमत्तांची ई-लिलावात बँक विक्री करते. ज्या मालकांनी बँकेचे कर्ज फेडलेले नाही. मालमत्ता विकण्यापूर्वी बँक मालकांना नोटीस बजावते आणि ते पैसे भरण्यास सक्षम नसतील, तर बँक मालमत्ता विकून त्यांचे पैसे वसूल करते.

About Editor

Check Also

FedEx to set up cargo hub at Navi Mumbai airport

FedEx: नवी मुंबई विमानतळावर फेडएक्स उभारणार कार्गो हब

एक्सप्रेस वाहतूक कंपनी फेडएक्सने बुधवारी घोषणा केली की ते अदानी समूहासोबत भागीदारीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *