अर्थविषयक

राज्यात ४ वर्षात १४ खाणी सुरु होत १३ हजार जणांना मिळणार रोजगार आदासा येथे कोळसा खाणीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्ते शुमारंभ

मुंबई: प्रतिनिधी आगामी ४ वर्षांत महाराष्ट्रात १४ खाणी सुरु होत आहेत आणि त्यातील ३ याच वर्षी सुरु करण्याचे आपण ठरविले आहे. या खाणींमुळे ११ हजार ५०० कोटींची गुंतवणूक होईल आणि सुमारे १३ हजार लोकांना रोजगार मिळेल अशी माहिती यावेळी वेस्टर्न कोलफिल्डने दिली. नागपूर जवळील आदसा येथील कोळसा खाणीचे मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

लॉकडाऊन असतानाही रायगडमध्ये गुतंवणूकीसाठी उद्योजक उत्सुक उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी दिल्ली-मुंबई- इंडस्ट्रिअल कॉरीडॉर प्रकल्पांतर्गत दीघी औद्योगिक क्षेत्रासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या क्षेत्रांपैकी ६ हजार हेक्टर क्षेत्रावर माणगाव एमआयडीसीची स्थापना करण्यास मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिलेली आहे. यामुळे सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून हजारो तरुणांना रोजगार संधी निर्माण होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी मे पाठोपाठ जून महिन्यातही कर्ज ? आर्थिक जमवाजमव करण्यासाठी वित्त विभागाची दमछाक

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोविड विरोधी लढ्याला आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसा कमी पडू नये यासाठी राज्य सरकारने सर्व योजनांसाठीचा निधी, अर्थसंकल्पीय तरतूदीनुसार राखीव ठेवण्यात आलेला निधी आतापर्यत वापरला. मात्र लॉकडाऊनमुळे राज्याची गंगाजळी आटल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मे महिन्यात कर्ज काढण्यात आले. आता पुन्हा एकदा जून महिन्याच्या पगारीसाठी कर्ज …

Read More »

देशात गंभीर आर्थिक मंदी, चौकटीबाहेर जावून खर्च करण्याची गरज काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा

कराड : प्रतिनिधी कोरोना  लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. लोकांना वेतन न मिळाल्यामुळे त्यांची क्रयशक्ती संपली आहे व बाजारपेठेत मागणी (demand) नष्ट झाली आहे. त्यामुळे पुरवठादारांच्या किंवा उद्योगांच्या मालाची विक्री (supply) होणे अवघड होणार आहे. जागतिक अर्थतज्ञांनी भारतामध्ये गंभीर आर्थिक मंदीचे भाकीत वर्तविले असून मागणी वाढावी यासाठी सरकारने चौकटी बाहेर …

Read More »

आता ३१ ऑगस्टपर्यत कर्जथकबाकी वसूलीसाठी तगादा नाही रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांता दास यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे सर्वच आर्थिक संस्था आणि केंद्रे बंद आहेत. त्यामुळे कर्ज थकबाकीदारांकडे पुढील आणखी तीन महिने तगादा लावू नये असे स्पष्ट आदेश रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांता दास यांनी दिले. तसेच बँकेच्या रेपो रेट मध्ये ०.४ टक्क्याने कपात करण्यात आली सून रिझर्व्ह रेपो रेट मध्ये ३.३५ टक्क्यांची कपात करण्यात आल्याने …

Read More »

मराठी तरूणांसाठी कोरोनाकाळातील उद्योग क्षेत्रात नव्या संधी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी संकटासोबत संधी निर्माण होते. कोरोना संकटामुळे उद्योग क्षेत्रांत अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा, याकामी महाराष्ट्र सरकार आपल्या पाठिशी उभे आहे. मराठमोळ्या हिमतीमुळेच कोरोनाच्या संकटावर आपण मात करून पुढे जावू, असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे व्यक्त केला. ‘ऑल इंडिया …

Read More »

पॅकेज-५: राज्यांना यापूर्वीच काहीस दिलयं: ओव्हर ड्राफ्ट देण्याची रिझर्व्ह बँकेला विनंती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी देशावर कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन करावे लागले. त्यामुळे प्रत्येक राज्यातील आर्थिक व्यवहार ठप्प झालेले असल्याने आर्थिक प्रश्नांनी आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केलीय. तत्पूर्वीच राज्यांना जीएसटी वसूली पोटी द्यावयाची रक्कम एप्रिल महिन्यातच दिली आहे. तर आजाराचा सामना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयांकडून ४ हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याचे सांगत आलेल्या …

Read More »

पॅकेज ४- आत्मनिर्भर भारतासाठी संरक्षण, अंतराळ, कोळसा, खाण उद्योगात खाजगी कंपन्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून घोषणा

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी कोरोना संकटाला संधीत रूपांतरीत करण्यासाठी आत्मनिर्भर भारताचा नारा देत लोकल टू ग्लोबल बनण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यातील ४ थ्या टप्प्यात अंतराळ, ऑटोमिक एनर्जी, संरक्षण, इस्त्रो, खाणी, विमानतळ, वीज वितरण, रिमोट सेंन्सिंग आदी क्षेत्रातील सरकारची एकाधिरशाही संपुष्टात आणत खाजगी गुंतवणूकदारांच्या मदतीने …

Read More »

पॅकेज-२: राज्याच्या धर्तीवर स्थलांतरीत कामगार, शहरी गरीबांसाठी भाडेतत्वावरील घरे वन नेशन वन रेशन कार्ड योजना अंमलात आणणार असल्याची अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा

नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशातील कामगार, सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक अडचणींची संक्रात आली. त्यामुळे येथून पुढे स्थलांतरीत आणि शहरी भागातील नागरिकांनासाठी भाडेतत्वावरील घरे उभारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्याशिवाय सर्वांसाठी घरे या योजनेतून बँकाकडून मिळणाऱ्या व्याज सूट मोहीमेला एक …

Read More »

पॅकेज-१: आयकरसाठी ३० नोव्हें. पर्यंतची मुदत : टीडीएस टीसीएसमध्ये २५ टक्के कपात लघु व मध्यम उद्योजकांसाठी ३ लाख कोटींचे कर्ज देणार

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे भेडसाव्या लागत असलेल्या आर्थिक नुकसानीत नागरिकांना आणि उद्योगांना दिलासा देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोकरदार, व्यापारी आणि उद्योजकांना उत्पन्नावरील आयकर भरण्यासाठी ३० नोव्हेंबर आणि ऑडिट करण्यासाठी ३१ ऑक्टोंबर पर्यंतची मुदत देत टीडीएस आणि टीसीएसच्या दरात थेट २५ टक्के कपात करण्यात येत असल्याची घोषणा केली. तसेच ही …

Read More »