राज्यातील पर्यटनवृध्दीसाठी केंद्राकडून प्रतिसाद मिळत नाही- आदित्य ठाकरे पर्यटन व्यावसायिकांना पॅकेज द्या व प्रोत्साहनासाठी विशेष अभियान राबवावे - ललित गांधी

कोल्हापूर: प्रतिनिधी

कोरोना महामारीच्या प्रदीर्घ काळ अस्तित्वामुळे महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राशी संबंधित ट्रॅव्हल एजंटस्, हॉटेल्स, रिसॉर्टस्, ट्रॅव्हल कंपन्या यांच्यासाठी विशेष पॅकेज द्यावे अशाी मागणी फिक्कीच्या राष्ट्रीय कार्यकारीनीचे सदस्य व महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.
फिक्की महाराष्ट्र समितीद्वारे २७ सप्टेंबर च्या ‘जागतिक पर्यटन दिनांच्या’ पार्श्‍वभुमीवर पर्यटन क्षेत्र, पर्यटन व्यावसायिक यांच्याशी निगडीत विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी विशेष व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती.

सदर ऑनलाईन चर्चासत्राचे उद्घाटन राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
महाराष्ट्राच्या समृध्द संस्कृति व पर्यटन स्थळांचे वैभव पर्यटनासाठी पोषक असल्याचे सांगुन टप्याटप्याने पर्यटन व्यवसायाला गति देण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील रेस्टॉरन्टस् लवकरात लवकर सुरु करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. तसेच राज्यात अधिकाधिक पर्यटक येतील अशा योजना सरकारतर्फे राबविण्यात येतील असे सांगुन केंद्र सरकारकडुन अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

पर्यटन व्यावसायिकांना राज्य सरकारतर्फे आर्थिक पॅकेज ची केलेली मागणी योग्य असुन राज्य सरकार सकारात्मक दृष्टीकोन ठेवुन निर्णय घेणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
या चर्चासत्राचे प्रास्ताविक फिक्की-महाराष्ट्राच्या चेअरमन सुलज्जा फिरोदीया यांनी केले. याप्रसंगी पर्यटन राज्यमंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन सचिव वल्सा नारायण सिंग यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री ठाकरे म्हणाले की, राज्यातील किल्ले, जल पर्यटन या ठीकाणी पर्यटकांसाठी अधिक सुविधा देण्याची योजना आहे. महाराष्ट्र सरकार राज्याच्या पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगिण व दिर्घकालीन विकासासाठी कटीबध्द असल्याचे आश्‍वासन देत कोरोना वर नियंत्रण, लोकांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देऊन निर्णय घेण्याचे सरकारचे धोरण आहे.

About Editor

Check Also

100 percent direct approval for foreign investment in the insurance sector.

एफडीआय: विमा क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला १०० टक्के थेट मान्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी एका महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणांचा भाग म्हणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *