कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयानों या गोष्टी करा अधिकारी कर्मचाऱ्यांना पीपीई किट व मास्क देण्याची सूचना

 मुंबई : प्रतिनिधी

खाजगी रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले पीपीई किट, एन 95 मास्क, ग्लोव्हज व इतर साहित्य उपलब्ध करण्याची सूचना मुंबई महापालिकेने केली असून त्यासंदर्भातील मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आले.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कक्षसेवक हे काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी खासगी रुग्णालय प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. शेख यांनी दिले होते. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने खाजगी रुग्णालयांसाठी मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत.

खासगी रुग्णालयासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक तत्वे

१) रुग्णालयात काम करणाऱ्या व प्रत्यक्ष कोरोनाबाधित रुग्णांना हाताळणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगारांना पीपीई किट, एन ९५ मास्क, ग्लोव्हज व इतर आवश्यक साधने उपलब्ध करुन द्यावीत.

२) रुग्णालयात काम करणारे अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना पुरेशी विश्रांती मिळेल याची दक्षता घेण्यात यावी.

३) रुग्णालयात काम करणा-या अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना त्यांचे मासिक वेतन वेळेवर अदा करावे.

४) रुग्णालयांत काम करणाऱ्या अधिकारी,कर्मचारी, कामगार यांना कर्तव्यावर उपस्थित होण्याकरीता वाहतूकीची पुरेशी साधने उपलब्ध नसल्यास त्यांच्याकरिता वाहतुकीची व्यवस्था करणे.

कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या व रुग्णांची सेवा करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेवक यांना संसर्ग होऊ नये व त्यांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी वरील सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन श्री. शेख यांनी केले आहे.

About Editor

Check Also

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा व राज्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *