प्रसिद्ध लिओनेल मेस्सीसोबत मुंबईतील फुटबॉलपटूंना सुवर्णसंधी “महादेवा प्रकल्पांतर्गत शिष्यवृत्ती योजना” अंतर्गत खेळण्याची संधी

महाराष्ट्र संस्था फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), सिडको (CIDCO) आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार क्रीडा विभागामार्फत, राज्यभरात “महादेवा प्रकल्पांतर्गत शिष्यवृत्ती योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील फुटबॉल खेळाचा विकास, प्रसार व लोकप्रियता वाढविणे हा आहे. ही योजना १३ वर्षांखालील मुलं व मुली यांच्यासाठी असून अर्जदारांची जन्मतारीख ०१ जानेवारी २०१२ ते ३१ डिसेंबर २०१३ दरम्यान असणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत जिल्हा, विभागीय आणि राज्य स्तरावर फुटबॉल निवड चाचण्या आयोजित केल्या जाणार आहेत. या निवड चाचण्यांच्या माध्यमातून राज्यातील ३० मुलं आणि ३० मुलींची अंतिम निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना १४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईत जागतिक ख्यातीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची अविस्मरणीय संधी मिळणार आहे.

मुंबई जिल्ह्यासाठीची निवड चाचणी नवल डी’सूझा फुटबॉल ग्राउंड, बांद्रा (मुंबई) येथे होणार असून, केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्या खेळाडूंनाच या निवड चाचणीसाठी माहिती व पुढील मार्गदर्शन मिळेल.

नोंदणीसाठी खालील लिंक सक्रिय करण्यात आली

https://forms.gle/6PAR766JoC9d2QH26

फुटबॉल खेळात उच्च कौशल्य असलेले आणि पात्रता निकष पूर्ण करणारे खेळाडूच नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क
सुधा राणे 93228 23035
श्रीमती. मनीषा गारगोटे, राज्य क्रीडा मार्गदर्शक, फोन नंबर -8208372034 यांना संपर्क साधावा.

About Editor

Check Also

‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत इच्छुक प्रशिक्षकांनी ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी प्रशिक्षकांना केले आवाहन

मिशन लक्ष्यवेध या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि शूटिंग या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *