मुंबई महापालिकेच्या आय़ुक्त पदाची जबाबदारी आता अश्विनी भिडे यांच्याकडे आयएएस अधिकारी भूषण गगराणी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागे अश्विनी भिडे यांची नियुक्ती

संपूर्ण देशभरात पुरुषांच्या बरोबरीने महिलांची संख्या वाढत आहे. तसेच प्रत्येक कार्पोरेट, सेवा क्षेत्र, यासह सर्व सरकारी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे. तरीही राजकारणात आणि नोकरी क्षेत्रात महिलांचा सहभाग आणखी वाढविण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच देशात महिला आरक्षण विधेयक पारित केले. त्याची अंमलबजावणी २०२७ पासून होणार असली तरी त्याची अप्रत्यक्ष अंमलबजावणी विद्यमान राज्य सरकारने सुरु करण्यात आली आहे. तत्कालीन मुख्य सचिव सुजाता सौनिक या महिला आयएएस अधिकारी राज्याला मुख्य सचिव म्हणून लाभल्या. त्यानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे आज सेवा निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी आता मुंबई मेट्रो रेलच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदाची धुरा मनिषा म्हैसकर-पाटणकर यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहे. तसेच त्यांच्याकडे जवळपास दोन वेळा या पदाची जबाबदारी होती. मात्र आता मनिषा म्हैसकर-पाटणकर यांच्या राज्याच्या गृह विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच गृह विभागाची जबाबदारी स्विकारण्याआधी त्यांच्याकडे राज्यातील सर्व महापालिकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांच्याकडे मागील अनेक वर्षापासून मुंबई मेट्रोचा पदभार आहे. तसेच एमएमआरडीच्या आयुक्त पदाची धुरा माजी आयएएस अधिकारी रत्नाकर गायकवाड यांच्याकडे होती, तेव्हापासून या पदाची जबाबदारी अश्विनी भिडे यांच्याकडे आहे. आतापर्यंत मेट्रोचे मार्ग निर्माणाचे आणि मेट्रो वाहतूक यंत्रणा मुंबईत सुरु करण्याचे काम यशस्वीरित्या करण्यात केले. त्यामुळे अश्विनी भिडे म्हणजे मुंबई मेट्रो अशीच ओळख निर्माण झाली. तसेच त्यांच्याकडे प्रत्येक राज्य सरकारने मेट्रोची जबाबदारी कायम ठेवली.

मात्र राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर अश्निनी भिडे यांना मंत्रालयात सुरुवातीला मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. तसेच मुंबई मेट्रोची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली. मात्र मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी मोठी असल्याने त्यांच्याकडील मुंबई मेट्रोचा अधिभार काही दिवसानंतरइतरांकडे हस्तांतरीत करण्यात येईल अशी चर्चा आहे.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईतील कुर्ला ते ट्रॉम्बे रेल्वे मार्गावरील झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करा लोकसभेत उपस्थित केला प्रश्न

मुंबईतील कुर्ला ते ट्रॉम्बे रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या कामामुळे हजारो कुटुंबांना नोटिसा देण्यात आल्या असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *