RTO Mumbai: बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

मुंबईदि. 18 राज्यातील वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूकीचे प्रकार वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट वेबसाईटस्‌संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

ड्रायव्हिंग लायसन्सवाहन नोंदणीई-चलन यांसारख्या सेवांच्या नावाखाली अनेक नागरिकांची वैयक्तिक माहिती व आर्थिक व्यवहारांची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. RTO Mumbai

फसवणूक करणारे मोबाईल एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेशांद्वारे आपल्या वाहनाचे चलन बाकी असून त्वरित दंड भरा’ तसेच ‘वाहन चालविण्याचा परवाना संस्पेंड होणार असून त्वरित तपासणी करा’ अशा संदेशांसह अनधिकृत पेमेंट लिंक पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. परिवहन विभागाने याबाबत सांगितले कीविभागीय परिवहन कार्यालय किंवा परिवहन विभाग नागरिकांना कधीही व्हॉट्सअॅप वरून पेमेंट लिंक पाठवत नाही. तसेच ‘RTO Services.apk’, ‘mParivahan_Update.apk’, ‘eChallan Pay.apk’ अशी अज्ञात एपीके फाईल्स डाउनलोड केल्यास मोबाईलमधील ओटीपीबँकिंग माहिती आणि इतर संवेदनशील माहिती चोरी होण्याचा धोका आहे. RTO Mumbai

नागरिकांनी वाहन नोंदणी सेवा (VAHAN) – https://vahan.parivahan.gov.in  ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI) – https://sarathi.parivahan.gov.in  परिवहन सेवा https://www.parivahan.gov.in  तसेच ई-चलन पोर्टल https://echallan.parivahan.gov.in   या gov.in डोमेनच्या अधिकृत सरकारी संकेतस्थळांचाच वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे .com, .online, .site, .in किंवा इतर कोणत्याही डोमेनवरील वेबसाइटवर वाहनधारकांनी माहिती नोंदवू नये. कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यानंतर तात्काळ नॅशनल सायबर क्राईम पोर्टलचे https://www.cybercrime.gov.in सायबर फसवणूक हेल्पलाइन क्रमांक 1930 किंवा जवळचे जिल्हा सायबर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार नोंदवावीअसे आवाहन सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी केले आहे.

About Editor

Check Also

मुलुंड मेट्रो दुर्घटना: कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कारवाई

मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) मार्गावर मुलुंड येथे आज झालेल्या दुर्घटने प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *