सीआयएससीई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परिक्षेचा निकाल ६ मे ला

कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स अर्थात सीआयएससीई च्या (CISCE) ६ मे रोजी इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षा निकाल जाहीर करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

“ICSE (वर्ग १० वी) आणि ICS (वर्ग १२ वी) ची घोषणा ६ मे रोजी सकाळी ११ वाजता केली जाईल,” असे बोर्डाचे मुख्य कार्यकारी आणि सचिव जोसेफ इमॅन्युएल यांनी ५ मे रोजी सांगितले.

निकाल बोर्डाच्या वेबसाइटवर, करियर्स पोर्टल आणि डिजीलॉकरवर उपलब्ध असतील.

दहावी आणि बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षा या सत्रापासून बंद करण्याचा निर्णयही बोर्डाने घेतला आहे.

“ज्या उमेदवारांना परीक्षेच्या त्याच वर्षी त्यांचे गुण किंवा ग्रेड सुधारायचे आहेत ते जास्तीत जास्त दोन विषयांमध्ये सुधारणा परीक्षा देऊ शकतात,” इमॅन्युएल पुढे म्हणाले. तर सुधारणा परीक्षा जुलैमध्ये घेतल्या जातील.

About Editor

Check Also

सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार महसूल विभागाचा निर्णय, वर्षपूर्तीच्या तोंडावर खरेदी दारांची घाई

आर्थिक वर्ष संपत येत असल्याने, तसेच नवीन वर्षानिमित्त मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांना वेग येण्याची शक्यता आणि महसूल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *