आयोजकांनो दहीहंडीच्या खर्चापेक्षा पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खर्च करा राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी
दहीहंडी उत्सव साजरा न करता या उत्सवाला येणारा खर्च पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खर्च करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजकांना केले आहे.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापुर, सातारा, कोकणामध्ये पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. जनजीवन पूर्वपदावर येण्यास काही काळ लागणार आहे. येथील पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरुच आहे. परंतु माणुसकीच्या दृष्टीने मानवतेचा विचार करून आपण कर्तव्य दक्षतेने त्यांना मदत करावी असेही ते म्हणाले.
मुंबईत मोठया प्रमाणावर श्रीकृष्ण जयंतीनिमित्त दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. त्यावर प्रचंड खर्चही करण्यात येतो. परंतु यावेळी मानवता धर्म म्हणून मुंबईकरांनो या आवाहनाला प्रतिसाद देवून पुरग्रस्तांना मदतीचा हात देवूया आणि माणुसकी धर्म पाळुया असे आवाहनही त्यांनी केले.

About Editor

Check Also

सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार महसूल विभागाचा निर्णय, वर्षपूर्तीच्या तोंडावर खरेदी दारांची घाई

आर्थिक वर्ष संपत येत असल्याने, तसेच नवीन वर्षानिमित्त मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांना वेग येण्याची शक्यता आणि महसूल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *