जोशी, लेले, मोने कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत सांगितला पहलगाममधील रक्तरंजित घटनाक्रम हर्षल लेले म्हणाला, गोळ्या झाडल्यानंतर वडिलांचे डोकं रक्ताने माखलं

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला. यापैकी ६ जणा महाराष्ट्रातील आहेत. तर चार जण डोंबिवलीतील तीन आणि पनवेलमधील एक जणाचा तर पुण्यातील दोघांचा समावेश आहे. त्यापैकी डोंबिवलीतील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने कुटुंबियांनी आज पत्रकार परिषद घेत पहलगाममधील दहशवाद्यांनी त्यांच्यासोबत घडवून आणलेला रक्तरंजित घटनाक्रम. तसेच यावेळी संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याने घटनाक्रम सांगताना त्या हल्ल्याचा थरार सांगत काय काय सहन करावं लागलं ते सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना हर्षल लेले यांने सांगितले की, दहशतवाद्यांनी जेव्हा गोळीबार सुरु केला तेव्हा माझा हात माझ्या वडिलांच्या (संजय लेले) डोक्यावर होता. बाबा त्यांना सांगत होते की, गोळीबार करू नका, त्यांनी हात वर केले होते, त्यावेळी माझ्या हाताला काही तरी जाणवलं. आधी मला वाटलं की माझ्या हातावर गोळी लागली. मी पटकले झुकलो, आणि उठून नंतर वडिलांच डोकं पाहिलं तर ते रक्ताने पूर्ण माखून गेलं होतं. मी हे जे पाहिलं तेव्हा स्थानिकांनी सांगितलं की तुम्ही आधी तुमचा जीव वाचवा, जिथे गोळीबार झाला ती जागा अशी आहे की तिथे जायला तीन तास लागतात, त्या ठिकाणी घोड्यानेच जाता येतं. गाडी, सायकर वगैरे काहीही जात नाही. हल्ला झाल्यानंतर सगळे घोडेवाले आले. बाकीचे चालत उतरत होते, चालत उतरण्यासाठी आम्हाला चार तास लागले. माझ्या आईला अर्धांगवायू आहे. तिला मी आणि माझ्या भावाने खांद्यावर उलचून आणलं. ताही अंतरावर घोडे होते, मग घोडा करून आम्ही तिला बेसला पाठवलं आम्ही चार तास चालत बेसला पोहोचलो. मला आणि इतरांना रूग्णालयात नेण्यात आल्याचे सांगितले.

पुढे बोलताना हर्षल लेले म्हणाला की, पहलगाम क्लब म्हणून जागा आहे. तिथे आम्हाला बसविण्यात आलं. आम्ही संध्याकाळी ६ च्या सुमारास पोहोचलो. पुढचे काही तास आम्हाला माहिती मिळत नव्हती. त्यानंतर ७.३० वाजण्याच्या सुमारास मला कळलं होतं की, तिघांचा मृत्यू झाला, माझ्या काकांनी एका आयपीएस अधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्या घरी राहू दिलं. सकाळी सातच्या सुमारास मला कळविण्यात आलं की, तुम्हाला मृतदेहांची ओळख पटवायची आहे. मी ओळख पटवली आणि परत आलो तेव्हा मी परत आलो तेव्हा मी सगळ्यांना सांगितलो. त्यांनी आम्हाला पोलिस कंट्रोल रूममध्ये गेलो. त्यावेळी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, अमित शाह हे सगळे तिथे आले होते. नंतर आम्ही मुंबईत तिघांचे मृतदेह घेऊन आलो आणि बुधवारी अंत्यसंस्कार पार पाडले असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या एक दिवस आधी माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *