मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर सेवा सुरू करावी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची सूचना

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करावी आणि महिलांसाठी विशेष सेवा सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री व मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली.

राज्य सरकारने महिलांना प्रवास करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर रेल्वेने नियमित सेवा सुरू केली नाही. ज्यामुळे महिला प्रवाशांना सुविधा मिळत नाहीय. एकीकडे रेल्वेमंत्री पियुष गोयल हे रेल्वे सेवा सुरू करण्यास तयार आहे ,मात्र राज्य सरकारने परवानगी दिली नाही सांगत आहेत. परंतु राज्य सरकारने आता परवानगी देवून सेवा का दिली जात नाही असा सवाल करतानाच केंद्र सरकार यामध्ये राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

रेल्वेने नियमित सेवा सुरू करा… जादा गाड्या सुरू करा… गर्दी होवू नये यासाठी अतिरिक्त सेवा सुरू करा अशी मागणीही त्यांनी केली.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांची मागणी, धारावीकरांच्या हक्कासाठी सरकारने हस्तक्षेप करावा स्थानिकांना बेघर व इतर जागी स्थलांतर करण्याची भिती, हा धारावीचा विकास आहे का अदानीचा?

धारावी पुर्नवसन प्रकल्पाच्या नावाखाली स्थानिकांना बेघर करुन अदानीचे टॉवर उभे करण्यासाठी सरकारच्या मदतीने काम सुरु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *