राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती उपाध्यक्षा आणि प्रदेश प्रवक्त्या सना मलिक – शेख या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपाने विरोध केला असल्याने अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ हा नवाब मलिक यांचा मतदारसंघ म्हणून ओळख आहे. तसेच या भागातून सना मलिक-शेख या नगरसेविका आहेत.
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून या मतदारसंघाचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी नेतृत्व केले आहे. मतदारसंघावर मजबूत पकड असलेल्या नवाब मलिक यांनी हा मतदारसंघ मुलगी सना मलिक – शेख हिच्यासाठी सोडला आहे. नवाब मलिक यांनी बांधलेला हा अभेद्य गड पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी सना मलिक – शेख या गेली पाच वर्षे काम करत आहेत. त्यामुळेच पक्षाने सना मलिक – शेख यांच्यावर विश्वास दाखवत अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
सना मलिक – शेख या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आशीर्वादाने आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघात काम करत आहेत. आता अणुशक्तीनगर मतदारसंघातून सना मलिक – शेख या आपलं नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेल्या राजकिय आरोपामुळे अटकेत असताना नवाब मलिक यांचा मतदारसंघ सांभाळण्याचे काम सना मलिक शेख यांनीच केले होते. त्याचबरोबर नागरिकांच्या अढी-अजचणी, स्थानिक भागातील विकासाचे प्रश्न आणि महापालिकेकडून मिळावयाच्या सुविधा योग्य प्रकारे मिळतात की नाही याकडे लक्ष ठेवले दिले. त्यामुळे सना मलिक-शेख यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Marathi e-Batmya