४००० हजार सेविकांचे आंदोलन मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या रूग्णालयातील आरोग्य सेविकांना किमान वेतन कायदा लागू करावा यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी गेले दोन दिवस संपावर असलेल्या आरोग्य सेविकांनी आज बुधवारी थेट मंत्रालयावर धडक मोर्चा काढत मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सरकारच्या विरोधात घोषणा देत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात तब्बल ४००० …
Read More »मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मॅको बॅंकेला प्रथम पुरस्कार
पगारदार सेवकांची बँक गटात सर्वोत्कृष्ट कार्य मुंबई : प्रतिनिधी देशभरातील नागरी बँका तसेच पगारदारांच्या सहकारी बँकांना ‘एव्हीएस पब्लिकेशन’ तर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या बॅंको पुरस्कार स्पर्धेत मंत्रालयातील अधिकाऱी आणि कर्मचाऱ्यांच्या दि महाराष्ट्र मंत्रालय ॲन्ड ऑफिसेस को-ऑप बॅंक लि., मुंबई (मॅको बॅंक) ची प्रथम पुरस्कार देऊन सर्वोत्कृष्ट बँक म्हणून निवड केली. या स्पर्धेतील ‘पगारदार सेवकांची बँक’ या …
Read More »शिवसेनाप्रमुखांचे स्मारक अंडरग्राऊंड होणार
महापौर बंगल्याची कागदपत्रे स्मारक समितीकडे हस्तांतरीत मुंबई : प्रतिनिधी राज्यातील तमाम शिवसैनिकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी शिवाजी पार्क जवळील मुंबई महापालिकेच्या महापौर निवासस्थानाची कागदपत्रे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मारक समितीचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. नियोजित शिवसेनाप्रमुखांचे स्मारक अंडरग्राऊंड अर्थात जमिनीखाली दोन …
Read More »भारतीय रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण करणार
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विकासासाठी मुंबई रेल मंडळात केंद्र आणि राज्य शासनाच्या सहायाने ७५ हजार करोड एवढी गुंतवणूक करण्यात येणार आहे. मुंबई रेल मंडळ हे १०० टक्के विद्युतीकरण असलेले पहिले मंडळ आहे. त्याचधर्तीवर संपूर्ण भारतीय रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा करत केंद्र …
Read More »मुंबई महानगरात ९ लाख बोगस मतदार
कारवाईचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आश्वासन मुंबईः प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशात जवळपास ९ लाख बोगस मतदार असून या बोगस मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्याची मागणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांच्याकडे केली. त्यावर या ९ लाख बोगस मतदारांची नावे तपासून काढून …
Read More »मुंबईतील कांदळवन स्वच्छतेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डकडून नोंद
वन विभागाची “हॅटट्रीक” मुंबई : प्रतिनिधी लोकाच्या सहभागातून किती उत्कृष्टपणे काम करता येते याचं उत्तम उदाहरण सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाने घालून दिलं आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने विभागाच्या तीन कार्यक्रमाची दखल घेतं त्यांच्या या कामावर उत्कृष्टतेची मोहोर उमटवली… २०१६ मध्ये २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प २ कोटी ८२ लाख …
Read More »शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच बेस्टचा संप लांबविला
शिवसेना प्रवक्ते अँड. अनिल परब यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप ताणला गेला तो केवळ शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच. त्यासाठी शशांक राव यांना हा संप ताणण्यासाठी नारायण राणे, आशिष शेलार आणि कपिल पाटील यांनी मदत केल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते अँड. अनिल परब यांनी करत हा संप लांबविण्यासाठी अदृश्य …
Read More »उद्धवजी, कामगारांना वाऱ्यावर सोडून बेस्ट विकणार आहात काय?
आमदार कपिल पाटील यांचा उध्दव ठाकरे यांना सवाल प्रति, मा. श्री. उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख महोदय, बेस्ट कामगारांचा संप सुरु आहे. आज सातवा दिवस आहे. महापालिकेत आपली सत्ता आहे. महापौर शिवसेनेचा आहे. बेस्ट कमिटी आपल्या ताब्यात आहे. स्टँडिंग कमिटी आपल्याच ताब्यात आहे. बेस्ट कामगार मराठी आहेत. तरीही या संपात …
Read More »बेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतूकीस मान्यता
गृह विभागातर्फे अधिसूचना जारी मुंबई : प्रतिनिधी बेस्ट संपाच्या कालावधीत मुंबई महानगर क्षेत्रात सर्व खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना आज गृह विभागामार्फत जारी करण्यात करण्यात आली. बेस्ट वाहतूक संघटनांनी त्यांच्या विविध मागण्यांकरीता काल ८ जानेवारीपासून संप पुकारला आहे. …
Read More »मंत्रालयातील संरक्षित जाळीवर तरुणाचे अनोखे आंदोलन
पोलिसांची तारांबळ उडाली मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयात विषप्राषन करून शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्याचं प्रकरण आता कुठे निवळत असताना पुन्हा एकदा मंत्रालयात एका तरुणाने चक्क मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर बांधण्यात आलेल्या संरक्षक जाळीवर बसून अनोखे आंदोलन केले. यामुळे मात्र पोलिसांची एकच तारांबळ उडाली. लक्ष्मण अण्णा साहेब चव्हाण (वय ४०) राहणार …
Read More »
Marathi e-Batmya