मुंबईः प्रतिनिधी मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागात पावसाचा जोर कायम राहिल्याने सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला येथील सखल भागांत पाणी साचलं आहे. रस्त्यांबरोबर अनेक रेल्वे ट्रँकवरही पाणी साचल्याने रेल्वेसहित रस्त्यावरील वाहतूकही धीमी झाल्याचे …
Read More »पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शोग्लिट्झ नवरात्री उत्सव २०१९ २ ओक्टोबर रोजीचे उत्पन्न मुख्यमंत्री सहायता निधीला देणार
मुंबई: प्रतिनिधी या नवरात्रीत, अल्हाददायक संगीतावर थिरकण्यासाठी तयार रहा! पूरग्रस्तांना मदत म्हणून निधी उभारण्यासाठी बोरीवलीत फाल्गुनी पाठक आपल्या सुमधूर संगीताने मंत्रमुग्ध करणार आहेत. या शोग्लिट्झ नवरात्री उत्सव २०१९ ची घोषणा शनिवार, ३१ ऑगस्ट रोजी भूमी पूजनाच्या वेळी करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या दुर्दैवी पूरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले, त्यांना सहाय्य …
Read More »महापालिकेने नोटीस बजाविलेल्या इमारतींचाच पुर्नविकासासाठी विचार राज्य सरकारच्या नव्या धोरणात तरतूद
मुंबईः प्रतिनिधी मुंबई शहरातील १४ हजार ८५८ जून्या व मोडकळीस आलेल्या इमारतीचे रखडलेले पुर्नविकासाचे काम मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला. मात्र हा पुढाकार घेतना पुर्नविकास योजनेत समाविष्ठ करताना फक्त मुंबई महापालिकेने ३५४ अन्वये ज्या इमारतींना नोटीस बजाविली अशाच इमारतींचा पुर्नविकास योजनेसाठी प्रामुख्याने विचार करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील …
Read More »विश्वचषकापर्यंत धडक मारणाऱ्या दिव्यांग क्रिकेट टीमचा कप्तान केणीचा सत्कार करा आमदार अतुल भातखळकर यांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी दिव्यांग क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाला विजेते पद मिळवून भारतीय टीमचा कर्णधार विक्रांत केणीचा राज्य शासनातर्फे जाहीर सत्कार करण्यात यावा अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य क्रीडा मंत्री आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या हुरहुन्नरी क्रिकेटपटूच्या कामगिरीची दखल घेत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्याचे …
Read More »जून्या व मोडकळीस इमारतींच्या पुर्नविकासासाठी अधिनियमात दुरूस्ती म्हाडाची नियोजन प्राधिकारी नियुक्तीचा मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबईः प्रतिनिधी मुंबईतील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यासह म्हाडा अधिनियम १९७६ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यास तसेच उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाला नियोजन प्राधिकारी म्हणून घोषित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबई शहरातील उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारती तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण …
Read More »ठाणे महापालिकेतील पीएफ घोटाळयाची चौकशी करा आ. आव्हाड यांची मागणी
ठाणेः प्रतिनिधी ठाणे महानगर पालिकेने साफ सफाईसाठी नेमलेल्या ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आणत सदर घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. या कंत्राटदारांनी पीएफ (भविष्य निर्वाह निधी) चे पैसे भरल्याच्या पावत्या जमा केल्याशिवाय त्यांना देयके दिली जाऊ नयेत, असा नियम …
Read More »भ्रष्ट अधिकाऱ्यांचा अहवाल पाठविण्याचे नगरविकास विभागाला आदेश लोकायुक्त कार्यालयाचे नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर यांना आदेश
मुंबईः प्रतिनिधी मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असलेला कनिष्ठ अभियंता कुंदन पाटील यांच्याकडून कायम सेवेत समावून घेण्यासाठी ७ लाख ५० हजार रूपये घेणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश लोकायुक्त कार्यालयाने नगरविकास विभागाला दिले. यासंदर्भात लोकायुक्त कार्यालयाने नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांना …
Read More »आयोजकांनो दहीहंडीच्या खर्चापेक्षा पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खर्च करा राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांचे आवाहन
मुंबईः प्रतिनिधी दहीहंडी उत्सव साजरा न करता या उत्सवाला येणारा खर्च पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खर्च करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजकांना केले आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापुर, सातारा, कोकणामध्ये पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. जनजीवन पूर्वपदावर येण्यास काही काळ लागणार आहे. येथील पूरग्रस्तांना …
Read More »मध्य- हार्बर रेल्वे सेवा ठप्प सिंग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची रेल्वे प्रशासनाकडून माहिती
मुंबईः प्रतिनिधी मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसला असून कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक अर्ध्या तासापासून ठप्प झाली आहे. तसेच पावसामुळे कल्याणकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेवरील सायन, कुर्ला रेल्वे स्थानक तसेच हार्बर मार्गावरील कुर्ला-वडाळा स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले …
Read More »मुंबई उपनगरवासिंयांना पावसाने घरात कोंडले शुक्रवारी रात्रीपासून सततच्या मुसळधार पाऊस अद्यापही सुरुच
मुंबई-ठाणे-कल्याण-डोंबिवली-विरारः प्रतिनिधी मुंबईसह उपनगरांतील कल्याण, डोंबिवली, विरार, वसई आणि नवी मुंबई परिसरात पावसाची जोरात बॅटिंग सुरु आहे. रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरांमधल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडून मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होवू लागल्याने उपगनरात राहणाऱ्या अनेक चाकरमान्यांना अक्षरक्ष घरात कोंडल्याची परिस्थिती पाह्यला मिळाली. तसेच मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावरील अनेक लोकल गाड्या …
Read More »
Marathi e-Batmya