मुंबईतील फनेल झोन मधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी डीसीपीआरमध्ये स्वतंत्र तरतूद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात घोषणा

मुंबईतील सांताक्रूझ, पार्ले व कुर्ला या भागात विमानतळाच्या फनेल झोनमधील उंचीच्या निर्बधांमुळे बाधित इमारतींच्या पुनर्विकासास चालना मिळावी यासाठी बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०३४ मध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. यामुळे निर्बंध असलेल्या बृहन्मुंबई क्षेत्रातील बाधित क्षेत्रातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुसह्य होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यासंदर्भात निवेदन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, फनेल झोनमधील इमारतींच्या उंचीवर मर्यादा असल्याने इमारतींचे बांधकाम, पुनर्विकास तेवढ्याच उंचीपर्यंत करता येतो. त्यामुळे या क्षेत्रातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना पूर्ण क्षमतेने (बेसिक + प्रिमियम एफ़एसआय + टिडीआर) परवानगीयोग्य संपुर्ण क्षेत्राचा वापर करून पुनर्विकास करणे शक्य होत नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून वारंवार मागणी करण्यात आली आहे.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, बृहन्मुंबई क्षेत्रातील उंचीचे निर्बंध असलेल्या विमानतळ फनेल झोनमधील जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुसह्य व्हावा याकरिता नियमावलीमध्ये विशिष्ट तरतूद करण्यासाठी बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०३४ मध्ये स्वतंत्र तरतूद करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे.

शेवटी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१कक) अन्वये फेरबदलाची सूचना जाहिर करण्यात येत आहे. या फेरबदलामुळे फनेल झोनमधील, तसेच अशा प्रकारे निर्बंध असलेल्या बृहन्मुंबई क्षेत्रातील इतर बाधित क्षेत्रातील जुन्या इमारतींचे पुनर्विकास सुसह्य होणार असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार महसूल विभागाचा निर्णय, वर्षपूर्तीच्या तोंडावर खरेदी दारांची घाई

आर्थिक वर्ष संपत येत असल्याने, तसेच नवीन वर्षानिमित्त मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांना वेग येण्याची शक्यता आणि महसूल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *