मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर ई-समर्थ प्रणालीच्या माध्यमातून पहिल्यांदाच पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश

मुंबई विद्यापीठातील शैक्षणिक विभाग, मान्यताप्राप्त संस्था आणि संलग्नित महाविद्यालयातील ( स्वायत्त महाविद्यालये वगळून) पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच ई-समर्थ प्रणालीच्या माध्यमातून ही पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठाने प्रवेशाचे वेळापत्रक जाहिर केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषांने एकेडॅमिक बँक ऑफ क्रेडिट आणि अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठामार्फत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत चारही विद्याशाखेतील विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. ही सर्व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक आहे. https://muadmission.samarth.edu.in/ या संकेतस्थवळावर जाऊन विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. प्रवेश नोंदणी ते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी संकेतस्थळावर व्हिडिओ लिंक देण्यात आली आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

ऑनलाईन नाव नोंदणी आणि प्रवेशअर्ज सादर करणे- २१ जुलै ते ०५ ऑगस्ट २०२३

विभागामार्फत कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी – २२ जुलै ते ०८ ऑगस्ट २०२३

तात्पुरती गुणवत्ता यादी- १० ऑगस्ट २०२३ ( संध्याकाळी ६ वाजता)

विद्यार्थी तक्रार – ११ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२३

अंतिम गुणवत्ता यादी – १४ ऑगस्ट २०२३ ( संध्याकाळी ६ वाजता)

ऑनलाईन पेमेंट फी – १४ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२३

वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग २१ ऑगस्ट २०२३ पासून सुरु करण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले.

About Editor

Check Also

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामात खंड नको २३ जानेवारी २०२७ पुर्वी पूर्ण झालेच पाहिजे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामात कोणत्याही प्रकारे खंड पडता कामा नये २३ जानेवारी २०२७ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *