२ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या कृतींमध्ये मानवतेचे मूर्त रूप आहे. ज्यामुळे त्यांचे जीवन हे केवळ राजकीय संघर्षाचे वर्णनच नाही, तर मानवतेच्या नात्याने केलेल्या अनेक प्रयोगांचे आणि त्यातून उमटलेल्या आदर्शांचा संग्रह आहे. दोन ऑक्टोबरला त्यांच्या …
Read More »शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला शिलाहारांच्या कोल्हापूर घराण्याच्या राजधानीचा मान या किल्ल्याकडेच
वारणा आणि पंचगंगेची उपनदी असलेल्या कासारी नदीचा जलविभाजक असलेल्या सह्याद्रीच्या पूर्व दिशेने पसरलेल्या रांगेच्या उंच डोंगर पर्नाल पर्वत म्हणजेच पन्हाळा. पन्हाळा हा पावनगड आणि पन्हाळा असा जोड किल्ला आहे. समोरच दख्खनचा राजा म्हणून ओळखला जाणार जोतिबाचा डोंगर याच रांगेत आहे. ईशान्येला पसरलेलं वारणेचे विस्तीर्ण खोरे, पूर्व आणि दक्षिणेकडे पंचगंगा आणि …
Read More »सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड समुद्रसपाटीपासून उंची १,०९२ मी., पूर्वेकडील बाजूस ३४० मी. आणि पश्चिमेकडे ८७० मी. खोल दरी
सह्याद्रीच्या उंचसखल डोंगररांगांमध्ये, दाट जंगलांच्या कुशीत आणि नागमोडी घाटांच्या वळणावर अभिमानाने उभा असलेला प्रतापगड हा मराठा इतिहासातील एक सोनेरी पान आहे. या गडाचे सामरिक महत्त्व केवळ त्याच्या उंचसखल भौगोलिक रचनेत नाही, तर आजूबाजूच्या दऱ्या, खोऱ्या आणि घाटांवर ठेवलेल्या नियंत्रणातही दडलेले आहे. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख …
Read More »स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे दार
सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीतील पहिला भक्कम पाया या गडाने घातला. तब्बल पंचवीस वर्षे स्वराज्याची राजधानी म्हणून राजगडाने अनेक ऐतिहासिक घटना, शौर्यगाथा, राजकीय निर्णय आणि युद्धांचा साक्षीदार होण्याचा मान मिळवला. मराठ्यांच्या पराक्रमाला व स्वराज्याच्या …
Read More »७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे? लेखक- राम पुनियानी यांचा खास लेख
भारतीय संसदेने दोन दिवस भारतीय संविधानावर चर्चा केली. विरोधी पक्षनेत्यांनी असा युक्तिवाद केला की आपल्या संविधानात समाजातील दुर्बल घटक, धार्मिक अल्पसंख्याक आणि इतरांच्या अधिकारांच्या वाढीसाठी मोठी जागा आहे, त्यांना भयंकर त्रास होत आहे. मुस्लिमांना द्वितीय श्रेणीचे नागरिकत्व देण्यात आले आहे. सत्ताधारी, संसदेतील भाजप नेते आणि संसदेबाहेरील त्यांच्या विचारवंतांनी असा युक्तिवाद …
Read More »हँडीकॅप लोकल रेल्वेचा प्रवास
जमील आज घाई घाईत उठला त्याच्यासाठी आज महत्वाचा दिवस होता. खूप दिवसांनी त्याला आज इंटरव्हिव ला जायचं होतं. रोशन लॉकडाऊनला रोशन ची नोकरी गेल्या नंतर त्याला. जी हवी, जशी हवी तशी नोकरी मिळेना. बिल्डिंग मध्ये राहायचा. पण एका वेळेनंतर भाडं देणं त्याला मुश्किल झालं. त्यांने भाजीचा गाडा टाकाला, पण तो …
Read More »पर्स नाही काही नाही ते उंदीर झालेत नां घरात पर्स नवीन हाय
तपू आज नेहमी पेक्षा स्थिर नव्हती तीचं कामात जराही लक्ष नव्हतं. ती सारखं सारखं आपल्या पर्सकडे बघत होती. घर पत्र्याचं. पत्र्याला छिद्र पडलेली. कोणी डोळा लावला तर अख्ख घर त्याच्या डोळ्यात बसेल. तपू चा नवरा सफाई कामगार. दारू घेतल्याशिवाय तो गटारात उतरत नसे. आयुष्यभराचा वनवास भोगून आल्या नंतर. नवऱ्याच्या घरात …
Read More »भूतकाळातील अन्यायाच्या परिमार्जनासाठी आरक्षण, पण नव्या अन्यायाची निर्मिती
प्रिय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीनों, तुम्ही सर्वांनी समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांसाठी १० टक्के आरक्षण मान्य केलात आणि सद्यपरिस्थितीत देशातील दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्ग (ओबीसी) समाजासाठी असलेल्या ४९% असलेल्या आरक्षणाच्या प्रमाणात वाढ केली. मात्र जे पूर्वापार (सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक) विषमतेत जगत होते त्यात आणखी एका आर्थिक दुर्बल घटकाच्या नव्या …
Read More »श्रीलंकेपासून आर्थिक धडे: भारताला तूटीचा पट्टा घट्ट आवळावा लागणार दिवाळखोरीतून भारताला अनेक आर्थिक धडे-लेखन स्वामीनाथन एस अंकलेसरीया अय्यर (टाईम्स ऑफ इंडियातून साभार)
नुकतेच श्रीलंकेतील राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांच्या विरोधात राष्ट्रपती निवासस्थानात स्थानिक नागरीकांनी घुसखोरी करत विरोध प्रदर्शन आंदोलन केले. या नाट्यमय घडामोडीनंतर श्रीलंकेतील दिवाळखोरीमुळे एकदंरीतच अर्थव्यवस्थेशी संबधित अनेक शिस्त (थेअरींच्या) त्याचे विश्लेषण करण्यास असमर्थ ठरत आहेत. वास्तविक पाहता मागील काही वर्षापासून श्रीलंकेतील तिजोरीत मोठ्या प्रमाणावर तूट (सरकारकडून प्रमाणाबाहेर खर्च) वाढत असल्याचे दिसून …
Read More »कोविड गुरुजी, आम्हाला माफ करा ! डॉ. प्रदिप आवटे यांनी व्यक्त केल्या कोरोना काळातील भावना
कालच्या ९ मार्चला महाराष्ट्रातील पहिली कोविड केस आढळून २ वर्षे पूर्ण झाली. कोविड पॅन्डेमिक ही मानवी इतिहासातील एक अभूतपूर्व घटना आहे. मानव प्राणी हा पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे,असे मानले जाते. अर्थात हे आपलं कौतुक आपण मानवच करत असतो. कोविड पॅन्डेमिकमधून या बुध्दिमान माणसाने काय बोध घेतला, हे ही या …
Read More »
Marathi e-Batmya