पुन्हां पुन्हां लाईट जाणं आणि अंगाला दरदरून घाम फुटणं आता अंगवळणीच पडू लागलंय. जगाशी घेणंदेणं नाही असं स्वतःला समजावून खोट्याने पुन्हां त्याच जगाच्या अंगणात हातपाय पसरून सल्ले देणं आता कमी केलं पाहिजे. म्हणून आता अंगणात ही जावेना. खूपदा लाईट जाते येते. त्यामुळे टिव्हीवरचं जग मोठ्या गॅप नंतर बांधणं कठीण होऊन …
Read More »गज्जा दत्ताराम पवार ( GDP ) पडला … सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवावर आधारीत काल्पनिक कथा
आज गावात देशभक्तीची प्रमाणपत्र वाटण्यात येत होती, देश अगदी आर्थिकदृष्ट्या जरी घरंगळत जात असला तरी देशभक्तीच्या उधाणात व्यवस्थित तरंगत असताना, पम्या ढोपरं फोडीत कार्यक्रम चालू असलेल्या सभागृहाच्या दारात आला, मोठ्याने ओरडला आपला जी डी पी पडला. कार्यक्रमाला अर्थशात्र विभागाचे घोणसे सर उपस्थित होते ते अचानक उभे राहिले आणि सगळ्यांचं लक्ष्य वेधून घेतलं ” बघा आपला देश …
Read More »राजा आणि मोर… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारित काल्पनिक कथा
आटपाट नगरात एक राजा राहायचा. हा राजा बरीच वर्ष जंगलात राहिला, असं त्याचं म्हणणं. पुराव्यासाठी बरेचसे फोटो त्याने प्रजेपुढे ठेवले. प्रजेने विश्वास ठेवला आणि राजाने आपला फोटो वॉट्सअप डीपी ठेवला. राजा खरंच जंगलात होता का यावर शंका उपस्थित करणाऱ्यांचे राजाने राजद्रोहाचा आरोप ठेऊन त्यांना इतर प्रजेपेक्षा नेहमी अपमानकारक वागणूक दिली. राजा राज गादीवर बसण्यापूर्वी आपण जंगलात साधू म्हणून …
Read More »बी पॉजिटीव्ह अमित तात्या… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावाधारीत काल्पनिक कथा
अमित तात्या लहानपणीच मुंबईला पळून गेला, साधारण दुसरीत असताना किऱ्याचं डोकं फोडलं भळाभळा येणार रक्त बघून मास्तर, किऱ्याचा बेवडा बाप आणि त्याही पेक्षा अस्सल बेवडा आपला बाप आपल्याला जिवंत ठेवणार नाही, याची भीती मानत ठेऊन अमित मुंबईत जाणाऱ्या गाडीमध्ये बसला. मुंबईत रस्त्यावर झोपला असताना, एका धार्मिक संघटनेचे लोकं येऊन आम्ही तुला आम्ही सगळं पुरवू आमच्या आश्रमात चल म्हणून घेऊन गेले. पोटाची भूक आणि डोक्यावर छप्परापुढे धर्म सुई एवढा आहे, ही समज त्याला त्याच क्षणी झाली. आश्रमात हवं ते खायला मिळतं होते. हवं ते करायला मिळत होतं नेहमीच्या शिकवणी पेक्षा …
Read More »न्यूज वाल्यांचा कोयंडा… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची प्रसारमाध्यमांची समाजावर पडलेल्या कोयंडारूपाची कथा
गावांत कोरोनाची बातमी अचानक गायब झाली. कुणी तरी आत्महत्या केल्याची बातमी सतत टीव्हीला येऊ लागली. लोकांना खूप काहीतरी तूटल्या सारखं वाटू लागलं. एखाद्या गोष्टीची सवय लागली आणि ती सवय अचानक थांबली की मेंदू सैरभैर होतो, तसं गाववाल्यांच झालं. अचानक कोरोनाची बातमी गेल्यापासून लोकांच्या घशाखाली घास उतरे ना. कोरोना अचानक नाहीसा झाल्यापासून. लोक बिंधास्त तालुक्याला जाऊ लागली. एकमेकांशी बोलू लागली. एकमेकांच्या घरात चहापाणी करू लागले. एकंदरीत सगळं काही चंगासी होऊन गेलं. गावांत चावडीवर बसून आता एकच चर्चा सुशांत सिंग राजपुत. अनिल हा गावाचा खबरी माणूस चुली पासून दिल्ली पर्यंतच्या सगळ्या खाजगी बातम्या त्याला दिवसभरात कोण कुठून पोहोचवायचा हे तोच …
Read More »मिस्टर विकास… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत कथा
जग्गूचा कुत्रा फेमस. जग्गूला २०१४ च्या प्रचार मोर्चात एका रस्त्याच्या कडेला पक्षाचा झेंडा चघळत पडलेला सापडला. जग्गूने त्याला उचलून घरात आणलं आणि मोदी निवडून आल्यावर चांगल्या पायगुणाचा कुत्रा म्हणून चक्क जग्गूने त्याचं जे बारसं घातलं, ते अख्या गावभर फेमस झालं. लोकांनी कुत्र्याचं नावं विकास ठेवलं. जग्गू ने गावाला विश्वास ठेवायला भाग पाडलं कि माझ्या कुत्र्याचा …
Read More »मूर्ती दहन… सर्जनशील लेखक आणि कलावंत सुदेश जाधव यांची खास कथा
काश्या म्हाताऱ्याच्या अंगणात तुडुंब गर्दी भरली होती. अंगणात पूर्ण भयाण शांतता. म्हाताऱ्याचा जीव कशात तरी अडकला होता. म्हाताऱ्याला कांदा भजी आवडायचे म्हणून गावच्या सरपंचाने एका प्लेटीतून कांदाभजी आणलेले. उशाला तसेच पडून होते. भजीला वास सुटला पण म्हाताऱ्याचा जीव काय सुटेना. म्हाताऱ्याला काहीतरी सांगायचं होतं पण म्हातारा काय तोंड उघडेना. म्हाताऱ्याला फणसाच्या गऱ्याचा वास …
Read More »राष्ट्रीय शिक्षण धोरण: उच्च शिक्षण , संशोधन आणि रोजगार संधी बंगरूळू येथील केएल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एस.एस.मंथा यांचा विशेष लेख
देशातील शालेय आणि उच्च शिक्षण एकाच छत्राखाली आणण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर केले. या धोरणातील तरतूदीनुसार एकूण जीडीपीच्या ६ टक्के खर्च शिक्षणावर खर्च करण्यात येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही सर्वाधिक रक्कम आहे. पण हे धोरण तयार करताना धोरणकर्त्या समितीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पडणाऱ्या खंडाबद्दल किंवा विद्यार्थी गळजीबद्दल जर …
Read More »भूमीपूजन… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवावरील कल्पनाधारीत कथा
दिन्या पुन्हा एकदा पेपरातले फोटो पाहू लागला . पेपराचे फाटलेले तुकडे पुन्हा पुन्हा तो जोडून जोडून रंग उडालेला चेहरा शोधत राहिला. दिन्या एका धार्मिक संस्थेचा कट्टर भक्त होता. बाबरी मस्जिद पाडताना असंख्य विटा आपण कशा फेकल्या, किती जणांची डोकी फोडली याचा हिशोब तेंव्हापासून पोरं जनमल्या जनमल्या पोरांच्या जणू कानातच सांगायचा. …
Read More »राष्ट्रीय शिक्षण धोरणातील शालेय पध्दतीत निर्माण होणारे प्रश्न एआयसीटीईचे माजी चेअरमन डॉ.एस.एस. मंथा यांचा शालेय शिक्षण धोरणावरील खास लेख
देशातील विद्यार्थ्यांना २१ व्या शतकातील आधुनिक पध्दतीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने केंद्राने नुकतेच राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा जाहीर केला. या मसुद्याची घोषणा आहे की “२०२२ पर्यंत अभ्यासाचे शिक्षण कमी करणे आणि त्याऐवजी समग्र विकास आणि २१ व्या शतकातील कौशल्य जसे की विचारसरणी, सर्जनशीलता, वैज्ञानिक स्वभाव, संप्रेषण, सहयोग, बहुभाषिक, समस्येचे निराकरण, …
Read More »
Marathi e-Batmya