शिंदे सेनेचे १५ नगरसेवक शिवसेना उबाठात करणार वापसी सचिन अहिर यांचा दावा; राजकीय वर्तुळात खळबळ

महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले जवळपास १५ माजी नगरसेवक फुटीच्या मार्गावर असून ठाकरेंच्या शिवसेना उबाठात प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते. शिवसेनेत हा मोठा राजकीय उलटफेर मानला जात असून चिन्हे दिसत शिवसेना (ठाकरे) नेते सचिन अहिर यांनी याबाबत दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांना अपेक्षित पदे, जबाबदाऱ्या किंवा आश्वासने न मिळाल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर आहे. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने एकहाती ८२ जागा जिंकल्या होत्या. मात्र शिंदे बंडानंतर मुंबईतील तब्बल ४६ माजी नगरसेवक शिंदेंच्या बाजूला गेले होते. आता यातीलच काही जण ठाकरेंसोबत पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत. नाराज असलेल्यांची नावे अद्याप जाहीर करणे शक्य नाही. मात्र दसरा मेळावा किंवा लवकरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे अहिर म्हणाले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी मातोश्री निवासस्थानी आमदार, खासदार आणि विधानपरिषद सदस्यांनी आगामी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी रणनीती आखण्यात आल्याचे समजते.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *