Breaking News

NEET परिक्षा गोंधळप्रश्नी १६०० विद्यार्थ्यांच्या याचिका, तर सरकारकडून हायपॉवर कमिटी लोकसभा निवडणूकीनंतर आता परिक्षा निकालाचा गोंधळ

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत देशातील एनईईटीसह इतर कोर्सेससाठी लागणाऱ्या पूर्वपरिक्षेसाठी एकच संकेतस्थळ सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारे घेतला. तसेच नोकरीविषयक अर्जासाठीही एकच संकेतस्थळही सुरु करण्यात आले. याशिवाय अशा परिक्षांचे पेपर फुटी प्रकरणी स्वतंत्र कायदा करून त्या अंतर्गत शिक्षा करण्याचा मुद्दा सुरुवातीला इंडिया आघाडी आणि नंतर केंद्रातील भाजपा सरकारने आश्वासन दिले होते. परंतु लोकसभा निवडणूका नुकत्याच पार पडल्या असून या कालावधीत झालेल्या एनईईटी अर्थात एनआयआयटीच्या परिक्षेत पुन्हा गोंधळ उडाल्याचे दिसून आले असून त्या गोंधळाच्या विरोधात १६०० विद्यार्थ्यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे अखेर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने निर्णय घेतला आहे की वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा NEET २०२४ ला बसलेल्या १,६०० विद्यार्थ्यांच्या तक्रारीसाठी हाय पॉवर कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG चा निकाल ४ जून रोजी जाहीर करण्यात आला. या निकालात अनेक इच्छुकांनी अनियमिततेचा उल्लेख केला आहे आणि पुन्हा चाचणी घेण्याची मागणी केली. बिहारमधील कथित NEET पेपर लीक घटना, कथित लपविलेले ग्रेस गुण, अतार्किकदृष्ट्या उच्च गुण, पूर्ण स्कोअरची अनपेक्षित संख्या आणि खूप उच्च कट-ऑफ स्कोअर यांचा समावेश असलेल्या इच्छुक १,६०० विद्यार्थ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.

याप्रकरणी आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना, NTA चे महासंचालक, सुबोध कुमार सिंग यांनी सांगितले की, यावेळी कोणताही पेपर फुटला नाही. कारण “परीक्षा सुरू झाल्यानंतर दोन तासांनंतर दुपारी ४.३० च्या सुमारास प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या. आम्ही ६ मे रोजी पेपर फुटल्याचे वृत्त नाकारले होते. परीक्षेच्या अखंडतेशी अजिबात तडजोड केली नसल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.

पुढे बोलताना सुबोधकुमार सिंग म्हणाले की, यावेळी फक्त एका प्रश्नाचा [विद्यार्थ्यांवर] परिणाम झाला. इतके प्रश्न तयार केले आहेत, पुनर्मूल्यांकन केलेल्या १,५६३ विद्यार्थ्यांपैकी ७९० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. एकूण १३ लाख विद्यार्थी पात्र. ज्यांनी ग्रेस गुणांची भरपाई केली आहे, त्यांच्या गुणांच्या एकूण टक्केवारीवर परिणाम झाला नसल्याचेही सांगितले.

यावर्षी NEET परिक्षेसाठी २३लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. NTA ला भौतिकशास्त्रातील एका प्रश्नाच्या तात्पुरत्या उत्तराची १३,३७३ आव्हाने मिळाली. “NCERT (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग) पाठ्यपुस्तकाच्या जुन्या आणि नवीन आवृत्त्यांमधील फरकांमुळे, विषय तज्ञांनी प्रश्नासाठी एका पर्यायाऐवजी दोन पर्याय योग्य मानले पाहिजेत,” असेही आता NTA ने म्हटले आहे.

सुबोधकुमार सिंग म्हणाले की, ही समस्या फक्त १,६०० विद्यार्थ्यांची आहे, ४,७५० केंद्रांपैकी फक्त सहा केंद्रांवर ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितेल.

पुढे बोलताना सुबोध कुमार सिंग म्हणाले की, यूपीएससीच्या माजी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील नवीन समिती गुणांच्या नुकसान भरपाईच्या मुद्द्यांवर आणि ज्या उमेदवारांचा वेळ वाया गेला आहे, त्यांच्या समस्यांवर मार्ग काढेल. तशी समिती शिफारस करेल आणि NTA मर्यादित वेळेत अहवाल देईल. समुपदेशन आणि प्रवेश प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

तसोच सुबोधकुमार सिंग म्हणाले की, आम्ही देशभरात एफआयआर नोंदवले आहेत, आम्ही पोलिसांना सहकार्य करू,

दरम्यान, एआयआय़टीच्या परिक्षेत २,००० हून अधिक विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने पुनर्परीक्षेचा आग्रह न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकद्वारे केला असून असा आरोप करण्यात आला आहे की, पूर्ण गुणांची अनपेक्षित संख्या आणि खूप उच्च कट ऑफ आहे. “एकूण ६७ विद्यार्थ्यांनी ७२० पैकी परफेक्ट ७२० गुण मिळवले, जे अत्यंत शंकास्पद आणि खरे वाटण्यासारखे नाही. असे कधी झाले नाही. सहसा, फक्त तीन ते चार विद्यार्थीच परिपूर्ण गुण मिळवतात,” असे त्यात म्हटले आहे.

ग्रेस मार्क्सच्या मुद्द्यावर, NTA डायरेक्टर जनरल सुबोध कुमार सिंग म्हणाले की, “ग्रेस मार्क्स फॉर्म्युला वेळ कमी होण्यावर आधारित आहे, प्रयत्न केलेल्या प्रश्नांवर आधारित आहे. कमाल ७२० होती, सर्वात कमी -२० होती, ती उमेदवारांवर अवलंबून होती.

ज्या १.६०० विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा आणि गुणांची भरपाई मागितली आहे, त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाईल, असेही सुबोधकुमार सिंग म्हणाले.

https://x.com/PIB_India/status/1799359066906775634

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *