राज्यातील मुंबई महापालिकेसह २९ विविध महापालिकांसाठी आज ७ ते ८ वर्षानंतर मतदान पार पडले. मात्र ज्या पद्धतीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा आणि विधानसभेसाठी मतदान पार पडून दोन दोन दिवस मतांची अंतिम टक्केवारी काही केल्या जाहिर केली जात नव्हती. त्यामुळे विधानसभा निवडणूकीवेळी भाजपाला मिळालेल्या मतांच्या टक्केवारवरून संशय व्यक्त करण्यात आला. आता त्याच धर्तीवर राज्य निवडणूक आय़ोगानेही दुपारी ३.३० वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी जाहिर करण्यात आली. मात्र दुपारी ३.३० नंतरची आकडेवारी अद्याप जाहिर केली नाही. कदाचीत ती आकडेवारीही निकालानंतर जाहिर करणार का असा सवाल मतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणूकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या धर्तीवर अर्धवट टक्केवारी जरी जाहिर केलेली असली तरी आज दुपारी ३.३० वाजेपर्यंत मुंबईत ४१ टक्के, ठाणे ४३ टक्के, कल्याण-डोंबिवली, ३८.६९ टक्के, नवी मुंबई ४५.५१ टक्के, उल्हासनगर ३४.८८ टक्के, भिवंडी-निझामपूर ३८.२१ टक्के, मीरा-भाईंदर ३८.३४ टक्के, वसई-विरार-४५.७१ टक्के, पनवेल-४४ टक्के, नाशिक-३९.६४ टक्के, मालेगांव-४६.१८ टक्के, धुळे-३६.४९ टक्के, जळगांव ३४.२७ टक्के, अहिल्यानगर- ४८.४९ टक्के, पुणे-३६.९५ टक्के, पिंपरी-चिंचवड- ४०.५ टक्के, सोलापूर- ४०.३९ टक्के, कोल्हापूर- ५०.८५ टक्के, सांगली मिरज कुपवाड-४१.७९ टक्के, छत्रपती संभाजीनगर- ४३.६७ टक्के, नांदेड वाघळा-४२.४७ टक्के, लातूर-४३.५८ टक्के, परभणी-४९.१३ टक्के, अमरावती-४०.६२ टक्के, अकोला ४३.३५ टक्के, नागपूर ४१.२३ टक्के, चंद्रपूर-३८.१२ टक्के, इचलकरंजी- ४६.२३ टक्के, आणि जालना महापालिका निवडणूकीत ४५.९४ टक्के मतदान झाले आहे.
आता दुपारी ३.३० ते संध्याकाळी ५.५० वाजेपर्यंतचे मतदान उद्या निकाल जाहिर झाल्यानंतर अंतिम टक्केवारी जाहिर झाल्यांनंतर विजयी उमेदवारीची मते आणि एकूण मिळालेली मते यावर उद्या चर्चा विरोधकांकडून झडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उशिराने मतांची अंतिम आकडेवारी जाहिर होण्याने राज्य निवडणूक आयोग पुन्हा एकदा टीकेचा धनी बनण्याची शक्यता अधिक आहे.
निवडणूक आयोगाकडून दुपारी ३.३० वाजेपर्यंत जारी केलेली आकडेवारी

Marathi e-Batmya