निनावी मंत्र्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जाहिरातीः रोहित पवार यांचा निशाणा मित्र पक्षातील मंत्र्याने फडणवीस यांच्या नावाने जाहिराती देत खुष करण्याचा प्रयत्न

राज्यात महायुतीचे सरकार स्थान्नापन्न आहे. मात्र या भाजपाचा मित्र पक्षाच्या एका मंत्र्याने मुख्यमंत्री फडणवीस यांना खुष करण्यासाठी अनेक प्रसारमाध्यमांमध्ये निनावी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. त्यासाठी कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्यात आल्याचे दिसून येते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधत टीका केली.

पुढे बोलताना रोहित पवार आपल्या एक्सवर ट्विट करत म्हणाले की, एकीकडे राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत, हा विश्वास होता असा उपरोधिक टीकाही केली.

रोहित पवार पुढे म्हणाले की, या कोट्यावधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता या जाहिराती देवेंद्र फडणवीस यांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर दिल्या असल्याचे समजले आणि विशेष म्हणजे हे मंत्री महोदय भाजपाचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत असे देखील कळत असल्याचे ट्विटद्वारे सांगितले.

शेवटी बोलताना रोहित पवार म्हणाले की, मला मिळालेली माहिती खरी असेल तर मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीने परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या? असा सवाल करत या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले? हा मंत्री कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील अशी आशाही यावेळी व्यक्त केली.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचे पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे मागणी सरकारी नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करा

पदोन्नतीमध्ये आरक्षण हा केवळ धोरणाचा विषय नाही तर तो एक घटनात्मक वचन आहे ज्याचा उद्देश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *