राज्यात सत्ता स्थापनेचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केल्यानंतर अखेर राज्यात महायुतीचे सरकार स्थानापन्न होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महायुतीच्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेत एकमेकांना चिमटे आणि धक्के दिले.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदी राहिलेले एकनाथ शिंदे हे उद्याच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे हे सहभागी होणार नसल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे अशी विनंती केली.
तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महायुतीच्यावतीने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. सत्ता स्थापनेसाठी ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजताची शपथविधीची वेळ राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दिली आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीच्या तीन प्रमुख पक्षांसह, जनसुराज्य पक्ष, स्वाभिमान पक्ष, रासप आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती झाली असून या सर्वांच्या पाठिंब्यांचे पत्र देण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.
त्यानंतर अजित पवार यांना याबाबत विचारले असता अजित पवार मिश्किलपणे म्हणाले की, मला एकनाथ शिंदे यांचे माहित नाही. परतुं मी तर शपथ घेणार असल्याचेही यावेळी सांगताच एकच हशा उसळला.
दरम्यान, अजित पवार यांनी दिल्ली दौऱ्या बाबत विचारले असता म्हणाले की, मी माझ्या कौटुंबिक कारणासाठी मी दिल्लीला गेलो होतो. मात्र काही वृत्तवाहिन्यांनी चुकीच्या पद्धतीच्या बातम्या चालविल्या. माझी पत्नी राज्यसभेवर खासदार आहे. तेथील घरात करायच्या बदलासाठी मी आर्किटेक्टला सोबत नेलो होतो. पण प्रसारमाध्यमांनी वेगळ्याच बातम्या चालविल्या होत्या. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या अनुषंगाने आणि घड्याळ चिन्हाच्या अनुषंगाने सध्या सर्वोच्च न्यायालयात खटला सुरु आहे. या सर्व खटल्यासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या वकीलांसोबत फक्त प्रफुल पटेल हे चर्चा आणि भेट घेत होते. यावेळी पहिल्यांदाच त्या वकीलांना भेटण्यासाठी गेल्याचेही यावेळी सांगत दिल्ली दौऱ्याची माहितीच दिली.
अजित पवार यांनी केलेल्या मिश्किल टीपण्णीवर बोलतान एकनाथ शिंदे यांनीही फिरकी घेत म्हणाले की, अजित पवार यांना सकाळ दुपार संध्याकाळी मंत्री पदाची शपथ घेण्याचा अनुभव असल्याचे सांगत चांगलाच चिमटा काढला.
यावेळी एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही याबाबत विचारले असता म्हणाले की, थोडं थांबा संध्याकाळपर्यंत सगळी माहिती मिळेल असे सांगत असतानाच अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, थोडी कळं काढा, त्यांच संध्याकाळी समजेलच. मी तर उद्या शपथ घेणार आहे मी थांबणार
नाही असे सांगत हळुच चिमटाही काढला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांची फिरकी घेत म्हणाले की, त्यांना सकाळ, संध्याकाळ शपथ घेण्याचा अनुभव आहे. त्यावर अजित पवार लगेच म्हणाले की, मागच्यावेळी आम्ही दोघांनी (देवेंद्र फडणवीस-अजित पवार) सरकार चालवायचं राहिलं होतं. पण यावेळी सरकार चालविण्याचं अधूर काम पूर्ण करणार असल्याचंही प्रत्युत्तर दिलं.
तसेच एकनाथ शिंदे म्हणाले की, मागील वेळी मला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शिफारस केली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी मी शिफारस केल्याचा आनंद आहे. मी साधं गावी गेलो तरी तुमच्यात चर्चा होत होत्या. त्यातच महायुतीचं सरकार स्थापन होत असल्याचा मला आनंद असल्याचेही यावेळी सांगितले.
🕞 3.32pm | 04-12-2024📍Mumbai.
LIVE | Press Conference#Maharashtra #Mumbai https://t.co/zuwHasElpB
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 4, 2024
Marathi e-Batmya