आयडॉलच्या एमएमएस व एमसीए प्रवेश परीक्षांचे अर्ज आजपासून ऑनलाईन सुरु ७२० आणि २ हजार विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेला एआयसीटीई व यूजीसीने एमएमएस व एमसीए हे दोन अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु करण्यास परवानगी दिली असून या अभ्यासक्रमाचे प्रवेश परीक्षांचे अर्ज ऑनलाईन माध्यमातून आजपासून ( दिनांक २४ सप्टेंबर २०२२ ) सुरु होत असून शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२२ आहे. तर एमएमएस व एमसीएची प्रवेश परीक्षा रविवार १६ ऑक्टोबर २०२२ रोजी ऑनलाईन होणार आहे.

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षांसाठी एआयसीटीई व यूजीसीने आयडॉलला मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) या अभ्यासक्रमासाठी ७२० जागांची मान्यता दिली असून हा अभ्यासक्रम आयडॉलमधून दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु आहे. हा अभ्यासक्रम एमबीए या अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे. तसेच आयडॉलमध्ये मास्टर ऑफ कॉम्प्युटर अँप्लिकेशन (एमसीए ) हा दोन वर्षाचा सुधारित अभ्यासक्रम आहे. यापूर्वी हा अभ्यासक्रम तीन वर्षाचा होता. या अभ्यासक्रमाला एआयसीटीई व यूजीसीने २००० जागांची मान्यता दिली आहे.

या दोन्ही प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन माध्यमातून मागविण्यात येत असून ते विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. दिनांक २४ सप्टेंबर २०२२ पासून हे अर्ज ऑनलाईन उपलब्ध होत असून शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२२ हि आहे. तर एमएमएस व एमसीए या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा रविवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी ऑनलाईन होणार आहे. या प्रवेश परीक्षेची सर्व माहिती विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यात ७० हजार पदांची लवकरच एमपीएससी मार्फत नोकरभरती नव्या पद्धतीने होणार नोकर भरती

राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *