नुकत्याच झालेल्या निवडणूकीत पक्षाचा नेता आणि उमेदवाराच्या विरोधात ज्या ज्या व्यक्तीने काम केले त्यांना ठिपण्याचे काम सध्या राज्यात काही राजकिय पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र बारामती लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. मात्र सुनेत्रा पवार यांचा नणंद सुप्रिया सुळे यांनी परावभ केला. त्यास ४८ तासांचा अवधी लोटत नाही तोच अजित पवार यांनी बारामती कुस्तीगीर परिषदेत अध्यक्ष पदावरून युगेंद्र पवार यांची हकालपट्टी केल्याचे वृत्त पुढे येत आहे.
लोकसभा निवडणूकीत युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात जाहिर भूमिका घेत सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला. तसेच अजित पवार यांनी घेतलेली भूमिका योग्य नसल्याचेही यावेळी जाहिर केले. त्यामुळे निवडणूक काळात पवार कुटुंबियामध्ये निर्माण झालेला दरी निवडणूकीनंतर संपेल अशी अटकळ व्यक्त करण्यात येत होती. मात्र लोकसभा निवडणूकीनंतर अजित पवार यांनी कुस्ती परिषदेच्या सदस्यांची बैठक बोलावत युगेंद्र पवार यांना कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्ष पदावरून हटविण्याचा निर्णय घेतला. ही बैठक अजित पवार यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. तसेच या बैठकीला युगेंद्र पवार हे उपस्थित राहु शकले नाहीत म्हणून या कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्ष पदावरून हटविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणूकीच्या वेळेपासून बारामतीत शरद पवार विरूध्द अजित पवार असा सामना निर्माण झालेला आहे. तरीही या दोघातील संघर्ष कमी व्हावा या उद्देशाने पवार कुटुंबियातील काही व्यक्तींकडून मध्यस्थीही करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय सुप्रिया सुळे यांनीही पुढाकार घेतला होता. मात्र अजित पवार यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे बोलले जात आहे. यापार्श्वभूवर आगामी काळात अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील दुरावा नजीकच्या काळात कमी होण्याची शक्यता दुरापास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यातच अजित पवार यांचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे वक्तव्य आणि त्यानंतर रोहित पवार व जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या पक्षाबाबत व्यक्त केलेली वक्तव्य केली. या वक्तव्याच्या आधारावर अजित पवार यांनी रात्रीत आज सकाळी तातडीने पक्षाच्या आमदारांची बैठक देवगिरी या शासकीय बंगल्यावर आज आयोजित केली होती. त्यामुळे अजित पवार यांनी त्यांच्या पक्षांच्या एकतेसाठी पुन्हा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
Marathi e-Batmya