राज्यातील शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेतलेले अजित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रमाणे स्वतंत्र पाडवा मेळावा घेणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच हा पाडवा मेळावा काटेवाडीत घेणार असल्याची घोषणा केली. तसेच यासंदर्भातील एक ट्विटही एक्सवर केले आहे.
दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे दिवाळी पाडव्यानिमित्त त्यांच्या चाहत्यांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बारामतीतील गोविंद बागेत पाडवा मेळाव्याचे आयोजन करत आहेत. शरद पवार आयोजित पाडवा मेळाव्यासाठी बारामतीसह राज्यभरातील बहुतांष कार्यकर्त्ये हे शरद पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि घेण्यासाठी बारामतीतील गोविंद बागेत हजेरी लावत असल्याचे दिसून आले आहे.
मात्र यावर्षी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून स्वतः उमेदवारी जाहिर करत त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास हजर राहिले. तर अजित पवार यांनीही त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे एकाच घरात दोन पक्ष आणि दोन उमेदवार असल्याने शरद पवार यांच्या पाडवा मेळाव्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार यांनी काटेवाडीत पाडवा मेळाव्याचे आयोजन केले आहे.
यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, दिवाळीच्या निमित्ताने धनंजय मुंडे आणि संजय बन्सोड आदी काहीजण मला भेटायचे म्हणत होते. तसेच बारामतीसह राज्यातील कार्यकर्त्येही भेटण्यासाठी येण्यास इच्छुक असल्याने त्या सर्वांसाठी आपण काटेवाडीच पाडवा मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे काही प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
आता अजित पवार यांनी वेगळा पाडवा मेळाव्याचे आयोजन केल्याने बारामतीत दोन पाडवा मेळावा आयोजित होणार स्पष्ट झाले असून या पाडवा मेळाव्याचा परिणाम बारामतीतील विधानसभा मतदारसंघातील कोणत्या उमेदवारावर पाडणार हे निवडूणक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. तसेच कोणाच्या पाडव्या मेळाव्याला जास्त गर्दी होणार हे ही या निमित्ताने पुढे दिसून येणार आहे.
बारामतीकरांनो,
सालाबादाप्रमाणे यंदाचा हा दिवाळी सण एकत्र येऊन आपण सगळे साजरा करूया..!दीपावली पाडवानिमित्त काटेवाडी येथील माझ्या निवासस्थानी मी तुमचं स्वागतो करतो..!
चला, बंधुभाव जपूया..! pic.twitter.com/1BZqBkVFKf
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 1, 2024
Marathi e-Batmya