चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचा मुलगा…

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत ७० हजार कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा उल्लेख भोपाळ येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केला. त्यानंतर काही दिवसातच शरद पवार यांचे पुतणे तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाबरोबर राज्यातील सत्तेत सहभागी झाले. त्यास आता जवळपास सहा महिने झाले असले तरी भाजपाबरोबर सत्तेत सहभागी होण्याचे राजकिय कौवतिक अद्याप कमी झालेले नाही. त्यातच लोकसभा निवडणूकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरुध्द अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात नुकताच सामना रंगला होता. त्यानंतर आता अजित पवार आणि शरद पवार यांच्यात शिरूर लोकसभा ममतदारसंघात थेट लढत होत आहे. या निमित्ताने अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपामधील नेत्यांसह शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा मुलगा नसल्यामुळे राजकीय संधी मिळाली नाही अशी खंत व्यक्त करत वयाच्या ८० वयानंतर नव्या लोकांना संधी द्यायला हवी, असे मत शरद पवार यांच्याबद्दल यावेळी मांडले.

भाजपासोबत जाण्याबाबत चर्चा झाली, पण सोबत जाण्याचा निर्णय झाला नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी मी निदान चर्चा झाली हे मान्य करत असून, मी या चर्चेचा साक्षीदार आहे. भाजपासोबत जाण्याबाबत दिल्लीत ज्या सहा बैठका झाल्या त्या बैठकांना मी स्वतः, प्रफुल पटेल आणि देवेंद्र फडणवीस हे ही उपस्थित होते असा दावा करत जर भाजपासोबत जायचे नव्हते तर मग सहा सहा बैठका का घेतल्या असा प्रति सवाल करत शरद पवार यांना जेव्हा एखादी गोष्ट करायची असते तेव्हा ते तसा निर्णय घेऊन तो इतरांवर थोपवतात असा आरोपही केला.

गेल्या वर्षी जुलैमध्ये, अजित पवार आणि इतर आठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे-भाजपा सरकारमध्ये सामील झाले, ज्यामुळे शरद पवार (83) यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडली.

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील सभेला संबोधित करताना अजित पवार म्हणाले, “माझं वयही ६० च्या वर आहे. आम्हाला संधी आहे की नाही? आम्ही चुकीचं वागतोय का? त्यामुळेच आम्ही भावूक होतो. शरद पवारही आमचे ‘दैवत’ आहेत. एक देव आणि यात काही शंका नाही, परंतु प्रत्येक व्यक्तीला ८० ओलांडल्यानंतर नवीन लोकांना संधी दिली पाहिजे असे सांगत मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली नसती का? होय, मला संधी मिळाली असती. मी त्यांचा मुलगा नसल्यामुळे मला संधी मिळाली नाही. हा कसला, न्याय आहे का? असा सवालही यावेळी उपस्थित केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, त्यांनी पुण्यात खूप मेहनत घेतली, जिल्हा सहकारी बँक त्यांच्या पक्षाच्या ताब्यात आणली. पुणे जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आली. पिंपरी-चिंचवड (पुणे जिल्ह्यातील) कधीच आमच्या ताब्यात नव्हते, पण १९९२ ते २०१७ पर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिका शहर पक्षाच्या ताब्यात आणून औद्योगिक क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून टाकला.

त्यांनी बारामती आणि तेथील विकास पाहण्यासाठी यावे, असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरून (मार्चमधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान) चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडताना म्हणाले की, त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा पराभव करायचा आहे, असे विधान केले होते. चंद्रकांत पाटील यांनी अशी टीका करायला नको होती. (त्या विधानानंतर) मी चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील भाजपाचे काम पाहण्यास सांगितले आणि ते (अजित पवार) आणि त्यांचे कार्यकर्ते बारामती लोकसभा मतदारसंघात लक्ष घालतील असे सांगत ते विधान करायला नको होते, पण त्यांनी असे का म्हटले ते कळले नाही, पण नंतर चंद्रकांत पाटील एक शब्दही बोलले नाहीत.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *