मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे वाटपः मंत्री कोणत्या दालनात बसणार मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत आणि विस्तारीत कोणत्या इमारती हे मंत्री बसणार

राज्य मंत्रिमंडळातील बिन खात्याच्या मंत्र्यांना खात्यांचे वाटप झाल्यानंतर वास्तविक पाहता राज्यातील जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून मंत्री झालेल्या आमदारांमध्ये रस्सीखेच सुरु झाली होती. मात्र या आमदारांना बसणार कोठे याची चिंता फारशी सतावत नव्हती. मात्र अखेर सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्र्यांना बसावयाच्या दालना संदर्भात शासन निर्णय जारी केला.

या शासन निर्णयानुसार महसूल मंत्री म्हणून कार्यरत असताना राधाकृष्ण विखे-पाटील यांना देण्यात आलेले पहिल्या मजल्यावरील दालन आता नवे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलेले आहे. तर आता नव्याने जलसंपदा मंत्री पदाची धुरा सांभाळणारे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पाचव्या मजल्यावर दालन देण्यात आले आहे.

याशिवाय माजी उच्च वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आता दुसऱ्या खात्याचा पदभार सोपविण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांना आता दुसल्या मजल्यावरील दालन देण्यात आले आहे. तर चंद्रकांत पाटील यांना तिसऱ्या मजल्यावरील दालन देण्यात आले आहे.

आता कोणत्या मंत्र्यांना कोणते आणि मंत्रालयाच्या कोणत्या मजल्यावर दालन दिले याची सविस्तर माहिती….

१)चंद्रशेखर बावनकुळे – दालन क्रमांक १०१, १०१ (२), १०१ (ब) १०४ ते १०८ पहिला मजला मंत्रालय विस्तार इमारत

२) राधाकृष्ण विखे पाटील – दालन क्रमांक ५०४, ५०६, ५०८ पाचवा मजला, मंत्रालय विस्तार इमारत

३) हसन मुश्रीफ – दालन क्रमांक २०५ ते २०७, दुसरा मजला मंत्रालय विस्तार इमारत

४) चंद्रकांत पाटील, दालन क्रमांक ३०२ ते ३०७, तिसरा मजला, मंत्रालय विस्तार इमारत

५) गिरीश महाजन, दालन क्रमांक ६०५, ६०७, ६०९, सहावा मजला मंत्रालय विस्तार इमारत

६) गणेश नाईक – दालन क्रमांक ५३६, ५३८, ५४० चौथा मजला मंत्रालय मुख्य इमारत

७) संजय राठोड, दालन क्रमांक १०२, पहिला मजला

८) दादा भुसे, दालन क्रमांक ७००, ७०१, मंत्रालय विस्तार इमारत

९) संजय राठोड, दालन क्रमांक १०२ मध्य बाजू, पहिला मजला मंत्रालय विस्तार इमारत

१०) धनंजय मुंडे, दालन क्रमांक २०१, २०२, २०४, २१२ दुसरा मजला, मंत्रालय विस्तार इमारत

११) मंगलप्रभात लोढा, दालन क्रमांक २०२, मध्य बाजू, दुसरा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

१२) उदय सामंत, दालन क्रमांक १०१, दक्षिण बाजू, पहिला मजला मंत्रालय मुख्य इमारत

१३) जयकुमार रावल, दालन ४०७, चौथा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

१४) पंकजा मुंडे, दालन ४०३, चौथा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

१५) अतुल सावे, दालन ५०१ दक्षिण बाजू, पाचवा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

१६) अशोक उईके, दालन ५०२, मध्य बाजू, पाचवा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

१७) शंभूराज देसाई, दालन ३०२, तिसरा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

१८) आशिष शेलार , दालन ४०१, चौथा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

१९) दत्तात्रय भरणे, दालन ३०१, तिसरा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

२०) आदिती तटकरे, दलान १०३, पहिला मजला, मंत्रालय मुख्य इमारत

२१) शिवेंद्रराजे भोसले, दलान ६०१, ६०२, ६०४ सहावा मजला, मंत्रालय विस्तारित इमारत

२२) माणिकराव कोकाटे, दालन २०३, दुसरा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

२३) जयकुमार गोरे, पोटमाळा, मंत्रालय, मुख्य इमारत

२४) नरहरी झिरवाळ, दालन २०१, दुसरा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

२५) संजय सावकारे, दालन ३०३ तिसरा मजला, मंत्रालय, मुख्य इमारत

२६) संजय शिरसाट, दालन ७०३, ७०४, ७०४ (अ), ७१० सातवा मजला, मंत्रालय विस्तारित इमारत

२७) प्रताप सरनाईक, दलान ३१४, ३१६, ३१८ तिसरा मजला, मंत्रालय विस्तार इमारत

२८) भरत गोगावले, दालन ३१४, ३१६, ३१८

२९) मकरंद जाधव, दालन, ३३६, ३३८ तिसरा मजला

३०) नितेश राणे, पोटमाळा, मंत्रालय दुसरा मजला मुख्य इमारत

३१) आकाश फुंडकर, दालन ११५, ११७, पहिला मजला, मंत्रालय विस्तार इमारत

३२) बाबासाहेब पाटील, दालन ५०१, ५०२, पाचवा मजला, मंत्रालय विस्तार इमारत

३३) प्रकाश आबिटकर, दालन क्रमांक २२७, दुसरा मजला, मंत्रालय विस्तारीत इमारत

राज्यमंत्र्यांना वाटप करण्यात आलेली दालने

१) आशिष जयस्वाल, दालन ६२६ ते ६२८, सहावा मजला

२) माधुरी मिसाळ, दालन १३८ व १४० पहिला मंत्रालय विस्तार, इमारत

३) पंकज भोयर, दालन २३७ आणि २४१

४) मेघना बोर्डीकर, विधान भवन दालन १२५ व १३०, ए व सी येथी तात्पुरती व्यवस्था

५) इंद्रनील नाईक, विधान भवन दालन १२३ १२४, तात्पुरती व्यवस्था

६) योगेश कदम, विधान भवन, दालन ११७ आणि १२२ तात्पुरती व्यवस्था

 

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचे पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे मागणी सरकारी नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करा

पदोन्नतीमध्ये आरक्षण हा केवळ धोरणाचा विषय नाही तर तो एक घटनात्मक वचन आहे ज्याचा उद्देश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *