पीक कर्जमाफीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय धुमाकूळ सुरू झाला आहे. अजित पवार यांच्या विधानाला महायुतीतील मित्रपक्षांकडून पाठिशी घालण्याचा प्रयत्न सुरु केला असताना , शिवसेना उबाठाने मात्र अजित पवार यांच्या वक्तव्याचा विरोध करत, महायुती सरकारने खोटी निवडणूक आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला.
बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस असोत की एकनाथ शिंदे, लोकांच्या हितासाठी काम करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. निवडणूक जाहीरनाम्यात कर्जमाफीच्या आश्वासनाबाबत अनेक नागरिकांनी चिंता व्यक्त केल्या आहेत. २८ मार्चपासून, मी महाराष्ट्रातील जनतेला स्पष्टपणे सांगू इच्छितो की, त्यांनी मार्च ३ च्या निवडणुकीमध्ये पीक कर्जमाफीची मागणी केली आहे. सद्य आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन, भविष्यात निर्णय घेतला जाईल, तथापि, घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे आवश्यक असल्याचे वक्तव्य केले.
अजित पवार यांच्या या वक्तव्याचा विरोधकांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना उबाठाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत म्हणाले की, महायुती सरकारने सत्तेत आल्यास पीककर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. आता मात्र कर्जमाफी करण्यास नकार देत आहेत. यामुळे गरीब शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत आणखी भर पडेल, अशी भीती व्यक्त केली.
अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र सरकार अदानीने घेतलेले हजारो कोटींचे कर्ज माफ करू शकते, परंतु ते शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन पूर्ण करू शकत नाही. या सरकारला फक्त निविदांमध्ये रस असल्याची खोचक टीकाही केली.
तर अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पवारांनी केवळ सरकारची भूमिका मांडली. पीक कर्जमाफी कधीच होणार नाही, असे त्यांनी कधीच सांगितले नाही, असा बचावात्मक पवित्राही घेतला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आम्ही जाहीरनाम्यात जी काही आश्वासने दिली आहेत, ती आम्ही पूर्ण करू. प्रत्येक आश्वासनाची पूर्तता केली जाईल. याला आम्ही छपाईची चूक म्हणणार नाही, असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya