शिवराज्याभिषेत सोहळ्या बाबत संभाजी भिडे यांच्या वक्तव्याबाबत संभाजी ब्रिगेड संघटनेने यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. त्यांनी या संदर्भात एक पत्रकच प्रसिद्धीस दिले आहे तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही संभाजी भिडे यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. याचा तात्काळ नसबंदी करा असे मिटकरी यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा नव्याने इतिहास बदलले चुकीचे म्हटले आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, ६ जून रोजीच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास संभाजी भिडे यांनी विरोध केला आहे. तसेच रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन राजकारण करु नका ती तशीच राहू द्या असेही विधान संभाजी भिडे यांनी केले आहे. यावरुन राजकारण तापले आहे. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेड या संघटनेने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जोरदार विरोध केला आहे.
संभाजी ब्रिगेड या संघटनेने संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांनी या संदर्भात एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे यांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध केला आहे त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. ६ जून ही तारीख ‘नामशेष’ करून टाका असं म्हणणं म्हणजे ज्या प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला विरोध केला होता त्यांच्याच कुळातील हा संभाजी भिडे आहे असं म्हणायला हरकत नाही. कुत्रा चावल्यामुळे या व्यक्तीच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसत आहे असेही या पत्रकात म्हटले आहे.
मराठा -बहुजन समाजातील पोरांची डोकी भडकवण्यासाठी हा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतो आणि पोरांच्या डोक्यामध्ये धर्मांध, विकृत आणि जातीवादी विष पेरतो. हा माणूस महाराष्ट्रासाठी धोका आहे. ६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा झाला होता.या घटनेला ३५१ वर्ष पूर्ण झाली आणि त्या दिवसाला हा माणूस जर ‘नामशेष’ करून टाका म्हणत असेल तर हा १००% शिवद्रोह आहे असेही संबाजी ब्रिगेडने म्हटले आहे.
Marathi e-Batmya