प्रतिकात्मक फोटो

राज्यात एकाचवेळी १०६१ पोलीस अंमलदार झाले पोलीस उप निरीक्षक गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील १०६१ पोलीस अंमलदार यांची पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. नवीन पदावर अधिक जोमाने कार्यरत रहा, तुमच्या सर्वांकडून अधिक उत्तम कामाची अपेक्षा आहे, अशा शुभेच्छा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदोन्नत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील १०६१ पोलीस अंमलदारांना पोलीस उप निरीक्षक या पदावर पदोन्नती देण्याचे आदेश जारी केले. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पदोन्नती देण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी अधिक जबाबदारीने नागरिकांची सेवा करण्यास सज्ज झाले आहेत. त्यांचे हार्दिक अभिनंदनही केले.

About Editor

Check Also

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं घोडं अडलं, राजकीय युतीचा मुद्दा आल्याने रखडलं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार विलनीकरणाबाबत फारसे उत्सुक नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) दोन गटांना पुन्हा एकत्र आणण्याच्या प्रयत्नांत अडथळे निर्माण झाले आहेत. नेतृत्व, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *