महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे झाल्यानंतर भाजपाच्या मदतीने शिवसेना पक्षाचे तुकडे झाले. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु त्यास मोठा कालावधी निघुन गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात १२ नोव्हेंबरपासून सुणावनी सुरु होणार आहे. त्यासंदर्भात कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी मोठे भाष्य केले.
असीम सरोदे म्हणाले की, तारीख देण्याची जी प्रक्रिया आहे ती वाईट पातळीला पोहोचली आहे. न्यायाला उशीर होणं हा अन्यायच आहे. तारीख देण्याच्या माध्यमातून अन्याय होत असेल, अन्यायाला खतपाणी मिळत असेल तर हा मुद्दा गंभीर आहे. उद्धव ठाकरेंची बाजू संवैधानिक पातळीवर अत्यंत मजबूत आहे. त्यामुळे जो निर्णय आहे तो न्यायालयाने त्वरीत द्यावा असं मला वाटतं असेही यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना असीम सरोदे म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या विरोधात निकाल देताच येणार नाही. कारण त्यांची बाजू मजबूत आहे. जो काही निकाल द्यायचा आहे तो निकाल लवकरात लवकर न्यायालयात द्यावा अशी मागणी आहे. एकनाथ शिंदे यांच्याबाजूने निकाल लागला तर काय हा प्रश्नच काल्पनिक आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागणारच नाही. हे माझं म्हणणं नाही. ज्यांना कायदा कळतो, संविधान कळत नाही ते कुणीही हे सांगतील. एकनाथ शिंदे यांचा प्रवास ज्यांना कळला आहे त्यांनाही माहित आहे. कारण एकनाथ शिंदे पक्ष चोरला आहे. निष्ठा विकली आहे. त्यांनी संविधानाची मोडतोड करून अडीच वर्षे मुख्यमंत्री पदही गाजवले. एकनाथ शिंदे यांच्याबाजूने निकाल लागणार असेल तर तो उद्धव ठाकरेंच्या बाजूनेनेच लागू शकतो.
असीम सरोदे पुढे बोलताना म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. तसंच जिल्हा परिषदांच्या निवडणूकाही जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तरी न्यायालयाने निकाल दिला पाहिजे, खरतंर एकनाथ शिंदेंनी न्यायालयात जाऊन सांगितलं पाहिजे की या प्रकरणाचा निकाल द्या, जर निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला धनुष्य बाण विरहित निवडणूका एकनाथ शिंदेंनी जिंकूण दाखवाव्यात असंही असीम सरोदे यांनी सांगितले.
शेवटी बोलताना असीम सरोदे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकनाथ शिंदे यांनी धनुष्य बाण विरहित आणि शिवसेना हे नाव वगळून लढून दाखवाव्यात. जर योग्य निर्णय झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र बदलू शकेल. जर उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला एकनाथ शिंदे भाजपाच्या गोटात जातील का असं विचारलं असता असीम सरोदे म्हणाले की, एकनाथ शिंदे भाजपाच्या गोटात दाखल झाले आहे. शिवसेनेतील फूट राजकिय कारणासाठी वापरण्यासाठी त्यांच अस्तित्व कायम ठेवलं आहे. जर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निकाल लागला तर त्वरीत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह काही लोकांना भाजपात घेतलं जाईल. जे उद्धट अर्वाच्च बोलणारे आहेत.ज्यांचे राजकीय चेहरे विद्रुप आहेत अशा लोकांना भाजपा त्यांच्या पक्षात घेणार नाही. एक मोठी राजकिय उलाढाल महाराष्ट्रात आपल्याला होताना दिसू शकते असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya