अयोध्येतल्या राम मंदीरासाठी शिवसेनेकडून मुंबईसह राज्यभरात महाआरती राम मंदीर आणि हनुमानाच्या मंदीरात संध्याकाळी आरत्या होणार

मुंबई : प्रतिनिधी

“पहिले राम मंदीर फिर सरकार” चा नारा देत अयोध्येत शिवसेने महाआरतीचे आयोजन केले. ही महाआरती आज शनिवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास होणार असून नेमक्या त्याचवेळेत मुंबईसह राज्यात ठिकठिकाणच्या राम मंदीरात आणि हनुमान मंदीरात या महाआरत्या शिवसेनेकडून करण्यात येणार आहेत. त्यामुळे आज संध्याकाळी संपुर्ण मुंबईत महाआरत्यांचे चित्र पाह्यला मिळणार आहे.

शहरातल्या सर्व राम मंदीर आणि ज्याठिकाणी राम मंदीर नसेल त्या भागात हनुमान मंदीरात या महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या महाआरतीची जबाबदारी आमदार सुनिल प्रभू, अँड. अनिल परब, सदा सरवणकर यांच्यासह विभागप्रमुख, शाखा प्रमुख, नगरसेवकांवर सोपविण्यात आली आहे. तर राज्यात त्या मतदारसंघातील आमदार, विभागप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे.

मुंबईतील महाआरत्यांची माहिती

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्याने शेतमालाचे भाव पडले सरकारकडे पैसे नसताना ८८ हजार कोटी रुपयांच्या महामार्गाची गरजच काय?

अमेरिकेबरोबर व्यापारी करार झाल्यापासून भारतातील सर्व शेतमालांचे भाव पडले आहेत, फळांचेही भाव पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *