राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी आदेश दिले. तसेच याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्या असे आदेशही यावेळी दिले. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील ५८ शहरे-जिल्ह्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती भाजपाने जाहिर केली आहे. भाजपा नेते आणि आमदार चैनसुख संचेती यांच्या सहीने या अध्यक्षांची यादी जाहिर करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशामुळे राज्यातील सर्वच राजकिय पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. त्याचबरोबर पक्ष बांधणीच्या कामालाही लागले आहेत. या निवडणूकांसाठी भाजपानेही आता कंबर कसली आहे. तसेच राज्यातील जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्थावर भाजपाच्या विजयाचा झेंडा फडकाविण्यासाठी भाजपाने राज्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय आणि स्थानिक पातळीवरील जिल्हाध्यक्ष पदी कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे.
त्यासंदर्भात भाजपाचे आमदार चैनसुख संचेती यांनी राज्यातील ५८ शहर-जिल्ह्यांच्या अध्यक्ष पदी निवडण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची यादी जाहिर केलेली आहे.
भाजपाने नियुक्त केलेल्या शहर-जिल्हाध्यांच्या निवडीची यादी खालील प्रमाणेः

Marathi e-Batmya