मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात राज्यपालांकडे दावा करण्याऐवजी एकंदरच निर्माण झालेल्या राजकिय परिस्थितीची माहिती भाजपाच्या शिष्टमंडळाने दिली. तसेच या परिस्थितीतून मार्ग काढण्याची विनंती भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांना राजकिय परिस्थितीची माहिती दिल्याचे भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्यपालांच्या भेटीसाठी सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन आणि आशिष शेलार यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
राज्यपालांना संपूर्ण राजकिय परिस्थितीची माहिती दिलेली आहे. तसेच राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
विशेष म्हणजे शिवसेनेनेकडून मुख्यमंत्री पदाचा सातत्याने दावा करण्यात येत असल्याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी त्यावर नो कॉमेंटस असे उत्तर दिले.
Marathi e-Batmya