विरोधकांच्या उपोषणाला भाजपचे निषेध उपोषणाचे प्रतित्तुर पंतप्रधान, मुख्यमंत्री, अमित शहासह केंद्रीय मंत्री, आमदार-खासदारांचे देशभरात उपोषण

मुंबई : प्रतिनिधी

देशात शांतता आणि सलोखा कायम रहावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नकारात्मक कारभाराच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसने देशभरात एकदिवसीय उपोषण केले. त्यास प्रतित्तुर म्हणून भाजप अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत विरोधकांनी कामकाज चालू दिले नसल्याच्या निषेधार्थ आज एकदिवसीय उपोषण करण्यास सुरुवात केली.

दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काही मंत्री आणि खासदारांनी उपोषणास सुरुवात केली. तर महाराष्ट्रात मुंबई येथील विर्लेपार्ले येथे प्रीतम हॉटेलच्या मागे असलेल्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष अँड. आशिष शेलार, खासदार परेश रावल, आमदार पराग अळवाणी यांच्यासह अन्य जणांनी उपोषणास सुरुवात केली. तर ठाणे येथे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सुरुवात केली. मात्र पियुष गोयल हे तब्बल ४५ मिनिटे उशीराने पोहचल्याने त्यांचे उपोषण उशीराने सुरु झाले.

कर्नाटकात निवडणूकीचा माहोल असल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उपोषणास सुरुवात केली.

दरम्यान या भाजपच्या उपोषणाच्या इव्हेंटमध्ये सहभागी झालेली नसताना शिवसेनेचे खासदार तथा केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते यांनी दिल्लीतील भाजपच्या मंचावर उपोषण करण्यास बसले. मात्र त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कान पिचक्या दिल्यानंतर गीते यांनी उपोषणाच्या मंचावरून माघार घेतल्याचे समजते.

 

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *