पुण्यातील राड्यानंतर फडणवीस म्हणाले, हे सगळं तोऱ्यात होत आहे राज्यातील भाजपाच्या विरोधात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीर टीका

काल सोमवारी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सोमवारी पार पडलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. त्यातच यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करतानाचे दृष्य पुढे आले. त्यानंतर या राजकीय गोंधळावरून सध्या राज्यातलं राजकारण तापू लागले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपलं राज्य आहे आणि आपले गृहमंत्री आहेत, या तोऱ्यामध्ये होत आहे. पण कारवाई झाली नाही तर आम्ही देखील सोडणार नाही असा इशआरा दिला.
स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला नेत्या वैशाली नागवडे यांच्यावर हात उचलल्याच्या प्रकरणावरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. याप्रकऱणी भाजपाच्या संबंधित कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या संरक्षणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर हल्ले करणे, पोलीस संरक्षणात आमच्या नेत्यांच्या सभांमध्ये आंदोलन करणं, आमच्या नेत्यांवर अंडी, टॉमेटो फेकण्याचा प्रयत्न करणं, हे सर्व स्पष्टपणे लक्षात येत आहे. आपलं राज्य आहे आणि आपले गृहमंत्री आहेत, या तोऱ्यामध्ये होत आहे. आम्ही लोकशाही मानतो त्यामुळे पहिल्यांदा तक्रार करू, पण कारवाई झाली नाही तर आम्ही देखील सोडणार नाही असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
दरम्यान या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी ट्विटरवरून भाजपावर निशाणा साधत, गॅस सिलिंडर ३५० रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती ताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे. भाजपाने राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये आणि या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी केली.
त्यानंतरच्या आपल्या ट्वीटमध्ये रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना टॅग करत चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस, आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल आणि आवराल अशी अपेक्षा होती. पण आपणच अशा प्रवृत्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कधीही न शोभणारं आहे असल्याचे नमूद करत एकप्रकारे डिवचले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यात ७० हजार पदांची लवकरच एमपीएससी मार्फत नोकरभरती नव्या पद्धतीने होणार नोकर भरती

राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *