राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके पडळकरांना म्हणाले, ..तुमचं डिपॉझिट वाचलं का? माझ्या मतदारसंघात येऊन माझ्यावर टीका करता

भाजपाचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने पवार कुटुंबियांवर आरोप करतात. मात्र यावेळी पहिल्यांच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलंश लंके यांच्या मतदार संघात जात पवार कुटुंबियांबरोबरच निलेश लंके यांच्यावर टीकास्त्र सोडले. गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला निलेश लंके यांनीही पडळकर यांना जोरदार प्रत्युत्तर देत आपल्या मर्यादा ओलंडल्या नाही पाहिजे असे सांगत तुमचं डिपॉझिट वाचलं का ते पहावं असा खोचक टोलाही लगावला.

भाजपाचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, रावणाची लंका एकट्या हनुमानाने जाळली. या लंकेची लंका जाळायला येथे बरीच लोक आहेत, अशी टीका केली.

निलेश लंके म्हणाले, आपल्या मर्यादा ओलांडल्या नाही पाहिजे. तुम्ही माझ्या मतदारसंघात येऊन टीका करता. मात्र, विधानसभेला तुमचं डिपॉझिट वाचलं का हे पहावे. आपल्या मतदारसंघात आपल्याला पाय ठेवायला जागा आहे का ते पाहायचे. आपल्याला किती मतं पडतात ते पाहायचं. माझ्या मतदारसंघात चालले माझी लंका जाळायला. विधानसभा निवडणुकीत ६२ हजार मतांनी मी प्रस्थापितांच्या विरोधात निवडूण आलो असा खोचल टोलाही त्यांनी पडळकरांना लगावला.

अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात असलेल्या ढवळपुरी येथे गोपीचंद पडळकर हे एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांच्यावर टीका केली होती. रावणाची लंका एकट्या हनुमानाने जाळली होती. या लंकेची लंका जाळायला येथे बरीच लोक आहेत. पवारांना बरं वाटावे म्हणून माझ्यावर बोलतो. मी अशा लोकांना किंमत देत नाही. मी पवार सोडून खाली अजिबात येत नाही. प्रत्येक अपमानाची गोष्ट डोक्यात ठेवायची असते, असे गोपीचंद पडळकर म्हणाले होते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी वंचित बहुजन आघाडीतून गोपीचंद पडळकर यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपाने गोपीचंद पडळकर यांना बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात तिकीट दिले होते. पण, पडळकर अजित पवारांनी टक्कर देऊ शकले नाही. त्या निवडणुकीत अजित पवार यांना १ लाख ९५ हजार ६४१ मते पडली होती. तर, पडळकर ३० हजार २८२ मतांपर्यंतच मजल मारु शकले. त्याचं डिपॉझिटही जप्त झाले होते.

About Editor

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा सल्ला, ‘उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’ रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *