संशयातीत बहुमत मिळूनही मागील १० दिवसाहून अधिक कालावधी लोटला तरी मुख्यमंत्री पद कोणाला मिळणार यावरून सातत्याने चर्चा झडत होत्या. मात्र आज भाजपाच्यावतीने विधान भवनात निरिक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आज भाजपाच्या विधिमंडळाच्या गटनेते पदासाठी आमदारांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी भाजपाच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
त्यानंतर भाजपाचे केंद्रीय निरिक्षक आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आमदारांनी दिलेला कौल ची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर राज्यातील मुख्यमंत्री पदावरील निवडीची घोषणा करण्यात येणार असल्याचेही सांगितले.
तसेच विजय रूपानी यावेळी म्हणाले की, दुपारी ३ वाजता तिन्ही पक्षाचे नेते राजभवनावर जात सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगत आज रात्री पर्यंत मुख्यमंत्री पदाचे नाव जाहिर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन उपमुख्यमंत्री पदासाठीही दोघांचा शपथविधी होणार आहे. मात्र त्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. त्यावर रात्रीपर्यंत शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले. BJP
भाजपाच्या विधिमंडळ गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड जाहिर करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या आमदारांनी विधानभवनातील शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच देवेंद्र फडणवीस समर्थक आमदारांनी विधान भवन परिसरात एकच जल्लोष आणि देवेंद्र फडणवीस यांचे हस्तांदोलन करत अभिनंदन करण्याची ओढ आमदारांमध्ये लागली.
दरम्यान, उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीसह १० इतर मंत्र्यांचा शपथविधी आझाद मैदानावर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री पदासह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
🕐 दु. १.०५ वा. | ४-१२-२०२४📍मुंबई.
LIVE | पत्रकार परिषद 🪷#Maharashtra #Mumbai https://t.co/PAfJE2Qu8y
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 4, 2024
Marathi e-Batmya