भाजपाच्या संबित पात्राला काँग्रेस शिकविणार कायदेशीर धडा काँग्रेस नेते नसीम खान यांचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी
भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोशल मीडियावर खोटा व्हिडिओ शेअर करुन आपली तसेच काँग्रेस पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्यांना कायदेशीर धडा शिकवणार असल्याचा इशारा काँग्रेस नेते नसीम खान यांनी देत त्यांच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्त, साकीनामा पोलीस स्टेशन, निवडणूक आयोगाकडेही यासंदर्भात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने अत्यंत हीन पातळी गाठली असून पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने विरोधी पक्षांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. एका जुन्या व्हिडिओची कसलीही शहानिशा न करता संबित पात्रानी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर शेअर करुन काँग्रेस पक्ष व आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजात तेढ निर्माण होऊन त्याचा फायदा व्हावा हा त्यांचा कुटील हेतू यामागे असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.
हा व्हिडिओ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान आरएसएसच्या एका स्वयंसेवकाने समाजमाध्यमावर प्रसारित करुन आपली व काँग्रेसची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करुन संबंधित व्यक्तीवर कारवाईही करण्यात आली होती. तसेच समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आलेला तो व्हिडिओ खोटा असून मुळ व्हिडिओची मोडतोड करण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले असतानाही मानसिक विकृत्तीतून पुन्हा भाजपाने हा खोटा व्हिडिओ प्रसारित केल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यात ७० हजार पदांची लवकरच एमपीएससी मार्फत नोकरभरती नव्या पद्धतीने होणार नोकर भरती

राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *