नाना पटोले यांची मागणी, …तर होणारी GST लूट थांबवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांची आठवण

केंद्रातील भाजपा सरकार असो वा राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार दोन्हीही शेतकरी विरोधी आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीची घोषणा विधानसभेत करुनही अजून शेतकऱ्यांना ती मिळालेली नाही. राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर शेतकरी महासन्मान निधीच्या नावाखाली तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा डाव आहे परंतु शिंदे फडणवीस सरकारच्या या षडयंत्राला शेतकरी बळी पडणार नाहीत. खते, बि-बियाणे, शेती साहित्यावर जीएसटी लावून शेतकऱ्यांची लूट सुरु आहे. सरकारला जर शेतकऱ्यांना खरेच मदत करायची असेल तर त्यांनी कृषी साहित्यावरील जीएसटीतून होत असलेली शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शेतकरी महासन्मान योजना ही फसवी आहे. महागाईमुळे शेती करणे परवडत नाही. शेतमालाला भाव मिळत नाही, शेतकरी आपला शेतमाल रस्त्यावर फेकून देत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, हमी भाव देणार या वल्गना हवेत विरल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल तीव्र संताप आहे. नुकसानभरपाई जाहीर करूनही ती अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. भाजपाप्रणित शिंदे सरकार केवळ घोषणा करत आहे. शेतकऱ्यांकडून १०० रुपये लुटायचे आणि १ रुपयाची मदत द्यायची ही बनियावृत्ती आहे. निवडणुका डोळ्यासमोर असल्याने त्यांना शेतकऱ्यांची आठवण झाली आहे पण शेतकऱ्यांवर या तुटपुंज्या मदतीचा काहीही परिणाम होणार नाही.

About Editor

Check Also

राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ चे पुरस्कार वितरण • सांगलीच्या मोरया गणेश मंडळाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक• हाँगकाँगच्या महाराष्ट्र मंडळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *