खैरेंचा मंत्रीमंडळात समावेश हा शिवसेनेचा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे प्रतिपादन

औरंगाबादः प्रतिनिधी
शिवसेनेचे जेष्ठ नेते यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करायचा की नाही हा शिवसेनेचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्यावर आम्ही भाष्य करणार नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे मंत्रीमंडळ तयार केल्यानंतर त्या मध्ये चंद्रकांत खैरेंचा समावेश होणार असल्याची चर्चा सुरु होती. पण यावर भाष्य फक्त शिवसेना नेतृत्वच करु शकते. शिवसेनेमध्ये या संदर्भात काही हालचाली सुरु आहेत की नाही याचीही माहिती माझ्याकडे नसल्याचे ते म्हणाले.
चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आहेत. उध्दव ठाकरेंच्या जवळचे आहेत. पक्षावर त्यांची पकड ही आहे. हे सगळेच मान्य करतात. निर्णय शिवसेना घेईल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

About Editor

Check Also

छगन भुजबळ यांची मागणी, राज्यात पीएनजी नेटवर्क वाढीसाठी केंद्र शासनाकडून आर्थिक पाठबळ आवश्यक निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी व पीएनजी गॅसचा अधिक चांगला व सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे

पीएनजी नेटवर्कचा राज्यभर विस्तार अधिक वेगाने करण्यासाठी केंद्र शासनाकडून तांत्रिक सहाय्य तसेच पायाभूत सुविधा उभारणीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *