राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला सुरुवात छगन भुजबळ आले, प्रफुल पटेल म्हणाले, ते ज्येष्ठ नेते ते आमच्या कुटुंबातील टोकाची नाराजी नाही

विधानसभा निवडणूकीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षात नाराजी छगन भुजबळ यांच्या निमित्ताने बाहेर आली. त्यातच छगन भुजबळ यांच्या नाराजीवरून स्वतः अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्याकडून नाराजी दूर करण्यासंदर्भात अद्याप कोणतीच भेट झाली नसल्याचे सांगितले जात असतानाच राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय अधिवेशासाठी नाराज छगन भुजबळ येणार की नाही अशी चर्चा रंगली होती. मात्र अखेर ज्येष्ठ नेते तथा आमदार छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय अधिवेशानास हजेरी लावली. तर छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटले यांनी भूमिका स्पष्ट केली.

विशेष म्हणजे छगन भुजबळ यांनी आपल्या नाराजीचा रोख अजित पवार यांच्यानंतर प्रफुल पटेल यांना दोषी धरत लक्ष्य केले आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रफुल पटेल यांना संपर्क साधत छगन भुजबळ यांच्या नाराजी संदर्भात विचारले असता म्हणाले की, छगन भुजबळ हे आणचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी १९९९ पासून पक्षाचे खंबीर नेतृत्व केले आहे. तसेच ते यापुढेही कायम पक्षाचे नेतृत्व करतील. मात्र त्यांच्या नाराजीचा मुद्दा हा आमच्या घरातील आहे. त्यामुळे त्यावर मार्ग काढू असेही यावेळी सांगितले.

प्रफुल पटेल पुढे बोलताना म्हणाले की, छगन भुजबळ यांनी नाराजी जी काही व्यक्त केली आहे. त्याबाबतच आम्ही लवकरच मार्ग काढू त्यासंदर्भात चर्चाही आम्ही करू. आम्ही सर्व एकाच कुटुंबात आणि एकाच पक्षात आहोत. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करू.

पुढे बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, मी कालच छगन भुजबळ या भेटलो आहे. काही गोष्टी असतात परंतु त्यांची नाराजी टोकाची नाही किंवा आम्ही त्यांची नाराजीवर मार्ग काढू अशी ती गोष्ट नाही की आम्ही त्यावर घरात बसून मार्ग काढू. मार्ग काढू शकत नाही अशी परिस्थितीही नाही. छगन भुजबळ हे आमच्या पक्षाचे आधारस्तंभ आहेत. सुरुवातीपासूनच नेतृत्व केले आहे. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीतही ते आमच्या पक्षाचे नेते होते. यापुढे राष्ट्रवादीत राहुन नेतृत्व करतील. त्यांच नेतृत्व आणि मार्गदर्शन आमच्यासाठी महत्वाचे असल्याचेही यावेळी सांगितले.

त्याचबरोबर छगन भुजबळ यांना डावललं आणि अपमानित करण्यात येत असल्याची भावना भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्याबाबत प्रफुल पटेल यांना विचारले असता ते म्हणाले की, तुम्ही जे अपमानित वगैरे जे शब्द वापरत आहात, ते शब्द योग्य नाहीत. छगन भुजबळ स्वतः काही गोष्टी बोलले असतीलही, पण मी त्यावर वेगळी प्रतिक्रिया काही देणार नाही. पण आम्हीचा एकाच कुटुंबात व पक्षात असून त्यांच्या मना कुठलीही नाराजी नाही. जर नाराजी असेलच तर ती आम्ही दूर करू असेही यावेळी यावेळी सांगितले.

तर अधिवेशनस्थळी छगन भुजबळ हे आल्यानंतर, नाराजी दूर झाली का असा सवाल प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी केला असता ते म्हणाले की, माझी नाराजी कायम आहे. मला सुनिल तटकरे यांनी विनंती केल्याने मी पक्षाच्या अधिवेशनाला आलो असे सांगत अधिक बोलणे टाळले.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *