परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या राज्यघटनेची विटंबना झाल्यानंतर त्यावर तेथील स्थानिक दलित समाजाची प्रतिक्रिया उमटली. यावेळी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी परभणी बंदची हाक दिली. मात्र या परभणी बंदच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांकडून सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान काही जणांनी अज्ञात समाजकंटकांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करत जाळपोळीच्या घटना घडवून आणल्याचे दिसून आले. त्यावर आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आणि चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर परभणीतील पोलिसांना आदेश दिले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस म्हणाले की, परभणीत राज्यघटनेची विटंबना होणे चुकीचे आहे. त्यानंतर असैवेधानिकरित्या करण्यात आलेले आंदोलनही चुकीच होतं. त्यामुळे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन वगैरे करण्याची गरज नाही. फक्त जे व्हिडीओ फुटेजमध्ये दिसून आलेले लाठ्या-काठ्या हातात घेऊन नाचणारे जे कोणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे आदेशही यावेळी पोलिसांना दिले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, परभणीत ज्याने राज्यघटनेची विटंबना केलेली आहे. त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे तेथील आंदोलकांनीही अवैध मार्गाने आंदोलन करू नये असे आवाहनही यावेळी भिमसैनिकांना करत या घटनेमागचा सुत्रधार शोधणार असल्याचेही यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर टाकलेल्या बहिष्काराबाबत बोलताना म्हणाले की, विरोधकांनी पाठविलेले पत्र आम्हाला मिळाले. ते पत्र वास्तविक पाहता जुनेच आहे. फक्त त्यावरची तारीख नवी आहे. राज्यात महायुतीला मोठा जनादेश मिळालेला आहे. त्यामुळे विरोधकांनी आता कामाची पद्धत बदलावी असा सल्ला देत त्यांनी सभागृहात मागणी केलेल्या कोणत्याही विषयावर सरकार चर्चेस तयार आहे. मात्र त्यांनी दिल्लीप्रमाणे मुद्दे उपस्थित करायचे आणि सभागृहातून पळ काढायचा असे करू नये असे आवाहनही यावेळी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, जरी विरोधकांचे संख्याबळ कमी असले तरी विरोधकांचा आवाज आम्ही दाबणार नाही. त्यामुळे विरोधकांचा आवाज तसाच कायम राहणार आहे. त्यामुळे विरोधकांनी योग्य ते मुद्दे उपस्थित करावेत सरकार चर्चेला तयार असल्याचा पुर्नरूच्चार करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाच्या निर्णयाबाबत राज्य सरकार काहीही करू शकत नाही. मात्र त्याचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे तेच याप्रकरणी निर्णय घेतील असेही यावेळी सांगितले.
तसेच मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. लवकरच पुढील एक दोन दिवसात मंत्रिमंडळातील सदस्यांचे खाते वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने राज्यातील विकास कामांना गतीशील चालना मिळेल असे सांगत आता महाराष्ट्र बदलणार असल्याचे यावेळी निक्षूण सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही यावेळी उपस्थित होते, उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, दरवेळी सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून बहिष्कार टाकला जातो. त्यामुळे यापुढे हे ही प्रथा सरकारकडून सुरु ठेवायची नाही या बाबत गंभीर विचार करावा लागले असे सांगत विरोधकांकडून बहिष्कार टाकण्याचा पायंडाच पाडला असल्याचेही यावेळी सांगितले.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेले एक ट्रिलियन डॉलरचे स्वप्न फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार निश्चित पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करत मंत्रिमंडळात कोणत्या पक्षाला कोणते खाते मिळणार, कोणाकडे कोणती खाती जाणार याबाबत उत्सुकता सर्वांना आहे. त्यानुसार योग्य ते खाते वाटेवाटप मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना होणार असून पुढील एक दोन दिवसात खाते वाटप जाहिर होईल असेही यावेळी सांगितले.
🕗 संध्या. ७.५५ वा. | १५-१२-२०२४📍 नागपूर.
LIVE | हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद#Maharashtra #WinterSession2024 https://t.co/GVqrJoDGFp
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 15, 2024
Marathi e-Batmya