मुख्यमंत्री शिंदे यांची संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पैसे वाटल्याच्या लेखातून आरोपावरून नोटीस बजावली

काही दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारच्या सामना या दैनिकात लेख लिहून लोकसभा निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगणित पैसा खर्च केल्याचा आरोप त्या लेखातून केला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनतेत चुकीची प्रतिमा निर्माण झाल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना नोटीस पाठवित एकतर माफी मागा किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जा असा सज्जड इशारा दिला.

मुख्यमंत्री शिंदे यांनी संजय राऊत यांना पाठविलेल्या नोटीसीत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी हे राजकिय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. त्याचबरोबर ते राज्याचे मुख्यमंत्री पदी असून विधान भवनातील शिवसेना या राजकिय पक्षाचे नेतेही आहेत. एकनाथ शिंदे यांच्या प्रती राज्यातील जनतेत एक चांगली प्रतिमा आहे. परंतु लोकसभा निवडणूकीनंतर जनतेमध्य असलेल्या प्रतिमेला धक्का देण्याच्या उद्देशाने राजकिय प्रेरित होऊन आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या तुमच्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी अशा पध्दतीचे वक्तव्य केल्याचा आरोप जनतेच्या मनात चुकीची प्रतिमा निर्माण होईल या उद्देशाने संजय राऊत यांनी जाणीवपूर्वक आरोप केल्याचा ठपका संजय राऊत यांच्यावर ठेवण्यात आला.

पुढे नोटीशीत मुख्यमंत्री एकनाथ म्हणाले की, तर सदर वक्तव्याबाबत नोटीस मिळाल्याबाबत तीन दिवसांच्या आत एकनाथ शिंदे यांची संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर बिनशर्त माफी मागावी अन्यथा पुढील कायदेशीर कारवाईला सामोरे जावे असा इशाराही यावेळी संजय राऊत यांना नोटीशी द्वारे दिला.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नोटीशीला संजय राऊत यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगिंगवरून फारच गंमतीशीर उत्तर दिले आहे. संजय राऊत आपल्या एक्सवर नोटीशीवर म्हणाले की, ५० खोके एकदम ओके, इसे कहते है उलटा चोर कोतवाल को डाटे, गैरसंविधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदे ने हमे एक लिगल नोटीस भेजी है., व्हेरी इंटरेस्टींग अॅण्ड वन ऑफ द फनी पॉलिटीकल डॉक्युमेंट. अब आयेगा मजा, असा सूचक इशाराही संजय राऊत यांनी दिला.

एकनाथ शिंदे यांनी पाठविलेली नोटीस खालीलप्रमाणेः

 

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *