मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, आखाती देशात अडकलेल्या नागरीकांना परत आणणार गिरिश महाजन आणि चीफ ऑफ प्रोटोकॉल यांच्यावर जबाबदारी

इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने एकत्र येत युद्ध पुकारले. या तीन चार दिवसांच्या कालावधीत अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या विरोधात हवाई बॉम्ब हल्ले कायम ठेवले आहेत. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्याला इराणनेही प्रत्युत्तर म्हणून त्या दोन देशांसह जिथे जिथे अमेरिकच्या नौलाची थळ आहेत त्या ठिकाणावर बॉम्बहल्ले सुरु केले आहेत. त्यामुळे रोजगाराच्या आणि फिरायला गेलेले अनेक महाराष्ट्रीयन या युद्धात अडकले. या अडकलेल्या मराठी जनांना भारतात सुखरूपरित्या परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आपली पावले टाकण्यास सुरुवात की आहे.

विधान परिषदेत यासंदर्भातील मुद्दा उपस्थित झाला. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, इराण आणि इस्रायल याचं जे युद्ध सुरु झालं. त्यानंतर एअर स्पेस बंद झाली. त्यानंतर भारतीय पर्यटक आणि व्यावसायिकंचे मेसेज् आपल्याला यायला लागले. त्यानंतर आपण केंद्र सरकाच्या परराष्ट्र मंत्रांलयाशी संपर्क केला. त्यांनी दूतावासाशी संपर्क करायला सांगितलं. आपल्या राज्याचे व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना आपण जबाबदारी दिली आहे. आपण डब्लूए नंबर दिलेला आहे. तिथल्या लोकांच्या अडचणी आपण दूर करतो आहोत, त्यांना परत आणण्याचे प्रयत्नही आपण सुरु केलेले असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, एअर इंडियांची विमानं हळूहळू जात आहेत आणि लोकांना परत आणत आहेत. काही एअर स्पेसेस सुरु आहेत काही बं द आहेत. जिथून आणता येणं शक्य़ आहे. तिथून आणंल जात आहे. कुवेतमध्ये हा प्रश्न निर्माण झाला होता. कारण ट्रान्झिटचे लोक तिथे आहेत. त्यांच्याकडे व्हिसा नसल्याने अडचणी होत्या. पण प्रयत्नपूर्वक त्यांना एके ठिकाणी थांबवलं आहे. मराठी मंडळ इतर मंडळांना घेऊन अक्टीव्हेट केलं आहे. तिथल्या मराठी लोकांना मदत करत आहोत. गिरीश महाजन यांनी अनेकांना व्हिडीओ कॉलही केले आहेत. आपले चीफ ऑफ प्रोटोकॉल आहेत त्यांनाही आपण जबाबदारी दिली होती. आपल्या दूतावासाची बैठक घेऊन तिथल्या नागरिकांना एसओपी दिल्या आहेत. दोनदा आपण लोकांना काय करायचं काय करू नये हे सांगितलं असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्यावतीने लोकांना परत आणलं आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारशी संपर्क साधला आहे. एअर स्पेस सध्या सुरक्षित नाही. त्यामुळे लोकांना परत आणण्याची व्यवस्था करत आहोत. एअरलाईन्सची काही विमाने उपलब्ध होत आहेत. आपण तीही पाठवित आहोत. असुरक्षित एअर स्पेसमध्ये विमान जावू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे. तिथे अडकलेले लोक महाराष्ट्रात येऊ शकतील अशी अपेक्षा आहे. हेल्पलाईन सुरु आहे. दुबईत भाजपाचे आमदार मिहिर कोटेचा यांनी जेवणाची व्यवस्था काही ठिकाणी सुरु केली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने ही मदत केली जात आहे. परदेशातील भारतीय, विद्यार्थीपर्यटक यांच्याबाबत मोदी सरकार अत्यंत संवेदनशील आहे. लोकांना परत आणण्याचं काम मागच्या पाच ते दहा वर्षातही केलं आहे. आता सगळ्या लोकांना सुरक्षित आणण्याचं काम केंद्र सरकारकडून केलं जाईल. तसेच दोन महिने पुरेल इतका इंधनसाठा भारताकडे आहे. त्यामुळे लगेच इंधन दरवाढ होईल अशी शक्यताही नसल्याचे यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांचा विश्वास, जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये… एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या ३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *