मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, तकलादू हिंदुत्ववादी आलेत त्यांचा समाचार घ्यावा लागणार लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचे केले जाहीर

जोपर्यंत राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मास्क काढत नाही तोर्पयन्त तुम्ही काढू नका, मागे बोललो होतो तरी पुन्हा बोलतो, मास्क सक्ती नसली तरी मास्क मुक्ती अजून झालेली नाही. लवकरात लवकर माझा इरादा आहे जाहिर सभा घ्यायचा. मास्क काढून बोलायचं आहे. सगळ्यांचा एकादा परामार्श सोक्षमोक्ष लावून टाकायचा आहे, हे तकलादू हिंदुत्ववादी आलेले आहेत, त्यांचा समाचार घ्यावा लागणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत भाजपा आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे नाव न घेता गर्भित इशारा दिला.

मुंबईत ‘बेस्ट’ बसच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज झाले.

यानिमित्ताने हिंदुत्व, हनुमान चालिसा अशा विविध मुद्द्यांचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. भाजपावर सडकून टीका करतांना लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचं ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले.

ताळतंत्र थोडसं सोडायला काय हरकत आहे. म्हणे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे…हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का ? बाबरी पडली तेव्हा तुम्ही बिळात लपला होतात. तुमचे हिंदुत्व आहे कुठे, आम्हाला हिंदुत्व शिकवत आहांत ? तुम्ही काय केलंत हिंदुत्वसाठी, राम मंदिर बांधण्याचा निर्णय हा तुम्ही घेतलेला नाही, राम मंदिरचा आदेश हा न्यायालयाने दिला, यांनी तर मंदिर उभारण्यासाठी झोळी पसरली होती अशी खोचक टीका भाजपाचे नाव न घेता केली.

हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी ? घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी गदाधारी हिंदुत्ववाल्यांना शिकवू नये, आमचे हिंदुत्व हे हनुमानाच्या गदेसारखे आहे, आमच्या घरी यायचे आहे तर या…पण दादागिरी करुन याल तर दादागिरी कशी मोडायची हे शिवसेनाप्रमुखांनी हिदुंत्वाच्या व्याख्येत सांगितल आहे असा इशाराही त्यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांचे नाव न घेता दिला.

इथे तर सगळ्यांनी मास्क काढले आहेत. जोपर्यंत राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मास्क काढत नाही तोर्पयन्त तुम्ही काढू नका, मागे बोललो होतो तरी पुन्हा बोलतो, मास्क सक्ती नसली तरी मास्क मुक्ती अजून झालेली नाही. लवकरात लवकर माझा इरादा आहे जाहिर सभा घ्यायचा. मास्क काढून बोलायचं आहे. सगळ्यांचा एकादा परामार्श सोक्षमोक्ष लावून टाकायचा आहे, हे तकलादू हिंदुत्ववादी आलेले आहेत, त्यांचा समाचार घ्यावा लागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

बेस्टमध्ये ई बससाठी पुढील ४ वर्षात एक हजार कोटी देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. माफक दरात दर्जेदार बेस्टची सेवा देत आहोत. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर आता खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना बेस्ट बस विशेष सुविधा देत आहे. मुंबई पालिकेतील शाळेचा दर्जा हा इतर कोणत्या राजधानी असलेल्या शहरात आहे का ? करायचं काही नाही, बिनकामाचे भोंगे जे वाजवत आहेत त्यांना काडीची किंमत देत नाही असा टोलाही त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावत आम्ही जे करतो ते बेस्टच करतो. हे सांगण्याचा हा कार्यक्रम आहे असा चिमटाही त्यांनी विरोधकांना काढला.

तसेच सध्या काहीजणांना जळजळतय, मळमळतय अशी अवस्था झाली अशी खोचक टीकाही त्यांनी भाजपाचे नाव न घेता केली.

About Editor

Check Also

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यास मान्यता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १२२ व्या बैठकीत निर्णय

“महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन व संवर्धन, तसेच दूध व दुग्धजन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *