Breaking News

काँग्रेस नेते १० ऑगस्टपासून मराठवाडा आणि विदर्भाच्या दौ-यावर प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते घेणार आढावा

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सज्ज झाली असून १० ऑगस्टपासून मराठवाडा आणि विदर्भात जिल्हानिहाय बैठका घेतल्या जाणार आहेत. प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री अमित देशमुख हे जिल्हानिहाय बैठका घेऊन काँग्रेस नेते पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

मराठवाड्यातील दौऱ्यात १० ऑगस्ट रोजी लातूर येथे लातूर, धाराशीव, बीड जिल्हा, दिनांक ११ ऑगस्ट रोजी नांदेड येथे नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्हा तसेच दिनांक १२ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा काँग्रेसची बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे. दिनांक १३ ऑगस्ट रोजी विदर्भात बुलढाणा येथे बुलढाणा, अकोला आणि वाशिमची, दिनांक १४ ऑगस्ट रोजी अमरावती येथे अमरावती, यवतमाळ जिल्हयाची बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली.

ऑगस्ट क्रांतीदिनी प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचा विजय संकल्प मेळावा

प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह काँग्रेस नेते उपस्थित रहाणार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय मेळावा ९ ऑगस्ट क्रांतीदिनी आयोजित केला आहे. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे यांनी दिली आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणाऱ्या या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रभारी रमेश चेनिथल्ला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकूल वासनिक, काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लीलोठीया, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, डॉ. विश्वजित कदम, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे उपस्थित राहणार आहेत.

मेळाव्यात विविध विषयावर चर्चा होणार असून अनुसुचित जाती विभागाच्या सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, संविधान रक्षक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मेळाव्याचे आयोजक तथा निमंत्रक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केले आहे.

Check Also

रोहित पवार यांचे छगन भुजबळ यांना आव्हान, आरोप सिद्ध करून दाखवा… प्रचंड दहशतीत असलेल्यांना धीर देणे चूकीचे काय

मागील सहा महिन्याहून अधिक काळ मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह मनोज जरांगे पाटील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *