काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकारविरोधात मुंबईत आंदोलन राष्ट्रवादीच्या कार्यालयात महत्वपूर्ण संयुक्त बैठक पार

मुंबई: प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस, युवक काँग्रेस (INC)आणि समविचारी पक्षाच्या युवकांची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयामध्ये आज पार पडली.
येत्या काळामध्ये सरकारच्या धोरणाविरोधात मुंबईमध्ये मोठे आंदोलन उभे करण्याचा निर्धार या बैठकीमध्ये करण्यात आला.
ही बैठक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे (INC) युवक अध्यक्ष सत्यजित तांबे, मुंबई अध्यक्ष गणेश यादव, उपाध्यक्ष सुरज ठाकूर, राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष रविकांत वरपे, शैलेश मोहिते, सरचिटणीस सुरज चव्हाण, मुंबई अध्यक्ष निलेश भोसले यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेस, युवक काँग्रेस (INC) आणि समविचारी पक्षांचे मुंबई जिल्हाध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचे पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे मागणी सरकारी नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करा

पदोन्नतीमध्ये आरक्षण हा केवळ धोरणाचा विषय नाही तर तो एक घटनात्मक वचन आहे ज्याचा उद्देश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *