पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा माफी मागा अन्यथा फिरू देणार नाही युवक व क्रिडा मंत्री सुनिल केदार यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी

मागील अनेकवर्षापासून काँग्रेस पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्यांनी केले आहे. सध्या पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी या करत असताना त्यांच्याच नेतृत्वाविषयी राज्यातील काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, मुकल वासनिक आणि मिलिंद देवरा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कृत्य लाज वाटण्यासारखे आहे. त्यामुळे या तिन्ही नेत्यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा रस्त्यावर फिरू दिले जाणार नसल्याचा इशारा काँग्रेस नेते तथा क्रिडा मंत्री सुनिल केदार यांनी दिला.

काही महिन्यापूर्वी काँग्रेस पक्षाध्यक्षाकडून भाजपाला रोखण्याबाबत फारशी कृती दाखविली जात नाही तसेच पक्षातील अनेक नेते पक्ष सोडून जात असताना नेतृत्वाकडून म्हणावा तसा आक्रमक दाखविला जात नसल्याच्या मुद्यावरून पक्षातील जवळपास १०० जणांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवित नव्या नेतृत्वाची मागणी केली. याच मुद्यावरून आज सोमवारी काँग्रेस कार्यकारणीची बैठक होत आहे.

दरम्यान राज्यात पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी कि राहुल गांधी यांनी करावे या मुद्यावरून दोन तट पडले असतानाच आता क्रिडा मंत्री सुनिल केदार यांनी त्या पत्रामध्ये पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्या सह्या असल्याची माहिती पुढे आल्याने त्यांनी या तिन्ही नेत्यांना इशारा दिला. तसेच राज्यातील काँग्रेसचे कार्यकर्त्येही तुम्हाला फिरू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

 

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मेट्रो मार्गांच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये सुरक्षित, जलद सार्वजनिक वाहतुकीस मोठी चालना २०३० पर्यंत ३०० किमीहून अधिक नवीन मार्ग सुरू करण्याचे नियोजन

राज्यातील मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असून मुंबई, पुणे, नागपूर तसेच मुंबई महानगर प्रदेश एमएमआरडीए च्या शहरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *